रोहिणखेड येथील ओम गणेश मंडळाचा अभिनव उपक्रम.. रक्तदान शिबिरात 34 युवकांनी केले स्वयंस्फुर्तीने रक्तदान

163

मोताळा(BNUन्यूज) तालुक्यातील रोहिणखेड येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे ओम गणेश मंडळाच्यावतीने ६ सप्टेंबर रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरामध्ये ३४ युवकांनी स्वयंस्फुर्तीने रक्तदान करुन रक्तदान हेच जीवनदान असा संदेश दिला. या गणेश मंडळाच्यावतीने दरवर्षी विविध समाजपयोगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.

रोहिणखेड येथील जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळेत 6 सप्टेंबर रोजी ओम गणेश मंडळाच्यावतीने आयोजीत रक्तदान शिबिरामध्ये धिरज काटे, अंबादास राजस, विजय कोठाळे, दयाराम राजनकर, गोपाल पोकळे, गोपाल तोत्रे, अजय सुसरे, गोपाल दांडेकर, सागर वानखेडे, गजानन पोकळे, अनिकेत हिंगे, तेजय पोकळे, गणेश पोकळे, मनोहर सोनूने, गणेश म्हसाळ, उमेश गुजर, गोपाल खेर्डेकर, अनंता राऊत, अजय वाघ, प्रतिक इंगळे, स्वप्नील दळवी, विरेंद्र पोकळे, विजानन सोनोने, सौरभ खेर्डेकर, विशाल पोकळे, शांताराम राजनकर, अजय सपकाळ, ज्ञानेश्वर डगे, रामचंद्र काटे, सचिन राजनकर, अनिल सुग्रामकर, अमोल आवटे, प्रशांत आवटे यांनी ओम गणेश मंडळाच्यावतीने आयोजीत रक्तदान शिबिरामध्ये स्वयंस्पूâर्तीने रक्तदान केले. या रक्तदान शिबिरामध्ये जिल्हा सामान्य रुग्णालय रक्तपेढीचे वैद्यकीय अधिकारी डॉ.शितल सोळंके, टेक्नीकल सुपरवायझर विनोद झगरे, अधिपरिचारक सोमनाथ खंडाळकर, समुपदेशक ज्ञानेश्वर गाडेकर, कक्षसेवक अनिल घोडेस्वार, पंकज धंदर, वाहन चालक प्रवीण इंगळे यांचे पथक उपस्थित होते. रक्तदान शिबिराच्या यशस्वीतेसाठी ओम गणेश मंडळाचे अध्यक्ष शैलेश देशमुख, उपाध्यक्ष अक्षय इंगळे, संभाजी हाडे, अजय सपकाळ, निवृत्ती सोनोने, प्रतिक काळे, आकाश मनस्कार, राहूल राजनकर, आकाश राजस, विलास राजनकर, स्वप्नील दळवी यांनी परिश्रम घेतले.