8 जाने.पासून सुरुवात; 15 जाने.ला काल्याच्या किर्तनाने सांगता
मोताळा : तालुक्यातील प्राचीन जागृत शिव मंदीर तिर्थक्षेत्र श्रुंगेश्वर संस्थान वडगाव (खं) येथे भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. यावर्षी 40 वर्ष असून गुरुवार 8 जानेवारीपासून संगीतमय रामायण कथा व अखंड हरिनाम संकिर्तन सप्हाताचे आयोजन करण्यात आले आहे. कथावाचन १००८ प.पु. गुरुवर्य महंत स्वामी ब्रम्हस्वरुपानंद गिरी महाराज श्रीक्षेत्र काशी विश्वनाथ, मुक्तेश्वर संस्थान उगवा फाटा (जि.अकोला) हे करणार आहे. 15 जानेवारी रोजी हभप.वासुदेव शास्त्री महाराज यांच्या काल्याच्या किर्तनाने सप्ताहाची सांगता होणार आहे.
सप्ताहात सकाळी ५ ते ६ काकडा आरती, ९ ते १२ व दुपारी ३ ते ५ रामायण कथा, सायंकाळी ५ ते ६ हरीपाठ, रात्री ८.३० ते १०.३० किर्तनाचे कार्यक्रम आयोजीत करण्यात आले आहे. गुरुवार 8 जानेवारी रोजी हभप.मधुकर महाराज निपाणा, 9 जानेवारी हभप.कन्हैया महाराज ब्राम्हंदा, 10 जानेवारी हभप.समाधान महाराज पाटील निमखेड, 11 जानेवारी हभप.वैष्णवीताई गावंडे अकोला, 12 जानेवारी हभप.विनायक महाराज सातव आळंदीकर, 13 जानेवारी हभप.दत्तात्रय महाराज साक्रीकर भुसावळ, 14 जानेवारी हभप.शिवदास महाराज राहणे पान्हेरा, गुरुवार 15 जानेवारी रोजी सकाळी 10 ते 12 हभप.वासुदेव महाराज शास्त्री वाघजाळ यांच्या काल्याच्या किर्तनाने सप्ताहाची सांगता करण्यात येणार आहे. संगितमय रामायण कथा व अखंड हरिनाम सप्ताहाचा परिसरातील भाविक-भक्तांनी लाभ घेण्याचे आवाहन आयोजक यांच्यावतीने करण्यात आले.



























