Friday, May 22, 2026
Home Breaking News मोताळा महावितरण कार्यालयाचा कारभार चालतो ‘रामभरोसे’??

मोताळा महावितरण कार्यालयाचा कारभार चालतो ‘रामभरोसे’??

61

अधिकारी सुट्टीवर: चार्ज कुणाकडे? शेतकऱ्यांनी दिले रिकाम्या खुर्चीला निवेदन

मोताळा- मोताळ्याच्या महावितरण कंपनीचे कार्यालय ‘रामभरोसे’ चालते काय? प्रश्न पडल्याशिवाय राहत नायं, त्याला कारणही तेवढचं मोठं आहे. महावितरणचे उपकार्यकारी अभियंता आर. एम. डाबरे हे सुट्टीवर गेल्यावर चार्ज दुसऱ्याकडे देणे, तसेच चार्ज कुणाकडे आहे हे कार्यालयातील कर्मचाऱ्यांना माहिती असणे गरजेचे असते. मात्र चार्ज कुणाकडे दिला? हे कार्यालयात उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांना माहिती नसल्याने मोताळा महावितरणचे कार्यालय ‘रामभरोसे’ चालते काय? असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित करीत शुभम घोंगटे व अमोल देशमुख यांच्या नेतृत्वात महावितरणच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन करीत रिकाम्या खुर्चीला निवेदन दिले.

ही घटना घडली, आज गुरुवार 8 जानेवारी रोजी मोताळा येथील मलकापूर रोडवरील महावितरण कंपनीच्या कार्यालयात दुपारी 1 वाजेच्या सुमारास.. मोताळा तालुक्यातील आव्हा येथील शेतकरी रोहित्र जळाल्याने महावितरणच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी गेले, ‘तो’ अधिकारी सुट्टीवर होता. शेतकऱ्यांचे निवेदन घेण्यास कुणीही तयार नसल्यामुळे सामाजिक कार्यकर्ता शुभम घोंगटे व अमोल देशमुख यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी दुपारी 1 वाजेच्या सुमारास कार्यालयात ठिय्या आंदोलन सुरु केले. आंदोलन चालू होते, शेतकरी महावितरणचा रोष व्यक्त करीत होते. त्यांच्या हातात रोहित्र जळाल्याने पिकाला पाणी देवू शकत नसल्यामुळे शेतातील वाळलेले पिके घेवून शेतकरी सत्य परिस्थीती ढेपाळलेल्या महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत होते. यावेळी उपस्थित कर्मचारी मात्र, बाहेर उभे होते.

  • अधिकारी सुट्टीवर चार्ज कुणाकडे?
    शेतकरी निवेदन देण्यासाठी गेले, मात्र अधिकारी हजर नव्हते. तेथे उपस्थित काही कर्मचाऱ्यांना विचारत होते, साहेब कुठे गेले? यावेळी कर्मचाऱ्यांचे उत्तर होते सुट्टीवर.. चार्ज कुणाकडे दिला? विचारत होते, मात्र उपस्थित कर्मचाऱ्यांना चार्ज कुणाकडे? हे माहिती नव्हते. चार्ज घेतलेला अधिकारी सुध्दा हजर नव्हता. चार्ज घेणाऱ्या अधिकाऱ्याने चार्ज त्याच्याकडे असल्याचे कार्यालयातील कर्मचाऱ्यांना अवगत करणे गरजेचे होते, मात्र, त्यांनी तसे न केल्यामुळे मोठा गोंधळ उडाला होता, हे विशेष!
  • वायरमनने केबलसाठी 6500 हजार घेतले?
    महावितरणच्या एका वायरमनने आव्हा शिवारातील शेतकऱ्यांकडून केबल जळाल्याने दुसरी केबल बसविण्यासाठी 6500 हजार रुपये घेवून नविन केबल दिल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. ‘त्या’ वायरमनने ‘ती’ केबल कुठून आणली? असा प्रश्न उपस्थित होत असून हा सर्व प्रकार रोहित्र जळाल्याने उजेडात आला, हे उल्लेखनीय!
  • सहाय्यक अभियंत्यांच्या आश्वासनाने आंदोलन स्थगित
    आव्हा येथील शेतकऱ्यांचा रोहित्राचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी शुभम घोंगटे व अमोल देशमुख मोताळा महावितरणच्या कार्यालयात गेले. निवेदन घेण्यास कोणीही तयार नसल्याने त्यांनी कन्हैयालाल सुर्यवंशी, प्रकाश घोंगटे, अर्जुन सुरळकर, अमोल घोंगटे, परमेश्वर सुरडकर, दिलीप कुकडे, संदीप कुकडे, दिपक घोंगटे यांनी ठिय्या आंदोलन केले. यावेळी सहाय्यक अभियंता एन.एम.चौधरी यांनी मलकापूर येथील वरिष्ठ कार्यालयास संपर्क साधून शेतकऱ्यांना रोहित्र उपलब्ध करुन देवून रोहित्र लवकर बसविण्याचे आश्वासन दिल्याने शेतकऱ्यांनी आंदोलन तुर्तास स्थगित केले.
Don`t copy text!