Friday, May 22, 2026
Home Buldana काँग्रेसमध्ये उपेक्षा; शिवसेनेने हेरला हीरा! अखेर….गुरुजी झाले बुलढाणा नगरपालिकेचे स्वीकृत सदस्य !!

काँग्रेसमध्ये उपेक्षा; शिवसेनेने हेरला हीरा! अखेर….गुरुजी झाले बुलढाणा नगरपालिकेचे स्वीकृत सदस्य !!

60

बुलढाणा: शहराचा वैचारिक चेहरा म्हणून कार्यरत प्रा.सुनिल सपकाळ यांना नगरपालिकेत स्वीकृत सदस्य म्हणून स्थान देण्यात आले आहे. त्यांच्या निवडीमुळे वैचारिक जडणघडण असलेला नेता आता नगरपालिका सभागृहात असणार आहे. काँग्रेसमध्ये असताना प्रचंड क्षमता असूनही ते उपेक्षित राहिले. मात्र, त्यांच्यातील नेतृत्व गुण हेरून आ.संजय गायकवाड यांनी शिवसेनेतर्फे त्यांना स्वीकृत नगरसेवक पदाची संधी दिली. प्रा.सपकाळ यांच्या निवडीने बुलढाण्यातील अनेक घटकांमध्ये आनंद व्यक्त केला गेला.

पार पडलेल्या नगरपालिका निवडणुकीमध्ये प्रा.सुनिल सपकाळ यांनी शिवसेना उबाठा.तर्फे नगरसेवक पदाची निवडणूक लढवली. यापूर्वी ते काँग्रेसमध्ये जिल्हा सरचिटणीस पदावर कार्यरत होते. काँग्रेसमध्ये असताना सर्वच उपक्रमांमध्ये त्यांचा सहभाग महत्वपूर्ण असायचा. निवडणुकीच्यावेळी काँग्रेसकडून तिकीट मिळणार नाही हे जवळपास निश्चित झाल्याने त्यांनी उबाठा. शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता. नुकताच, त्यांनी शिंदे सेनेत प्रवेश करून राजकीय खळबळ उडून दिली होती. जेव्हा ते शिंदे सेनेत गेले तेव्हाच पुढे राजकीय समीकरणे नक्कीच बदलणार, असे मानले जात होते. त्यानुसार आज स्वीकृत नगरसेवक पदासाठी त्यांचे नाव आल्याने बुलढाण्याच्या राजकारणात अनेकांना अनपेक्षित धक्का बसला आहे.

  • हीरा पारखण्याचे काम केले
    शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी काम केले, सामाजिक क्षेत्रात गेल्या 25 वर्षापासून ते कार्यरत आहे. दीर्घकाळ कार्य करूनही नगरसेवक पदाने त्यांना हुलकावणी दिली होती. परंतु त्यांच्यातील उर्मी त्यांना स्वस्त बसू देत नव्हती. हा गडी आ.संजय गायकवाड यांनी हेरला. विश्वास दर्शवीत त्यांना स्वीकृत नगरसेवकपदी स्थान दिले. एकप्रकारे हीरा पारखण्याचे काम त्यांनी केले. बौद्धिक क्षमता असणारा नगरसेवक म्हणून प्रा. सपकाळ नगरपालिकेमध्ये असणे शहराच्या सामाजिक जडण-घडणीमध्ये महत्त्वाचे ठरणार आहे.
  • शिवसेनेसाठी जमेची बाजू
    गटनेते कुणाल गायकवाड यांनी प्रा.सुनिल सपकाळ यांच्यासह मोहन पऱ्हाड, उदय देशपांडे यांची नावे स्वीकृत साठी सादर केली. नगरपालिका सदस्य म्हणून त्यांची झालेली निवड ही अर्थातच संधी असून त्या संधीचे सोने प्रा.सपकाळ करू शकतात. तूर्त वैचारिक बैठक असणारा सक्रिय पदाधिकारी मिळाल्याने ही शिंदेसेनेसाठी देखील जमेची बाब आहे.
Don`t copy text!