मोताळा: शिर्डी येथे ओम साई विकास प्रतिष्ठाण व बीबीसी.फिल्म प्रोडक्शन महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने शिर्डी येथे महाराष्ट्र साई जीवनगौरव समाजभूषण पुरस्कार 2026 चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मोताळा नगर पंचायत लिपीक संतोष शंकर इंगळे यांना शनिवार 10 जानेवारी रोजी ‘साई जीवनगौरव समाजभूषण पुरस्कार’ देवून मान्यवरांच्या हस्ते सन्मानीत करण्यात आले.
संतोष इंगळे हे मोताळा येथील रहिवासी आहे. ते मागील 21 वर्षापासून मोताळा नगरपंचायत येथे लिपीक पदावर कार्यरत आहेत. इंगळे यांना गायनाची प्रचंड आवड आहे. नोकरी सांभाळीत त्यांनी आपला गायनाचा छंद चालूच ठेवला. वेळोवेळी इंगळे यांनी गायनातून ती सिध्द केली. त्याची पोचपावती म्हणून त्यांना प्रमाणपत्र, पुरस्कार देवून सन्मानीत करण्यात आले आहे. ओम साई विकास प्रतिष्ठान व बीबीसी.फिल्म प्रोडक्शन शिर्डी यांच्यावतीने कला, क्रीडा, शैक्षणिक, सामाजिक, पत्रकारीता, वैद्यकीय, सिने अभिनय, गायनक्षेत्रात उत्कृष्ठ कामगिरी करणाऱ्यांना साई जीवनगौरव समाभूषण पुरस्कार देवून सन्मानीत करण्यात येते.
इंगळे आहेत मोताळा न.पं.चे लिपीक
संतोष शंकर इंगळे यांच्या गायनाची दखल घेत त्यांना शिर्डी येथे 10 जानेवारी रोजी आयोजीत एका कार्यक्रमात अध्यक्ष सुदाम संसारे, उपाध्यक्ष सौ.विद्या ठाकूर, सल्लागार डॉ.माधव किसन वानखडे मान्यवरांच्या हस्ते ‘जीवनगौरव समाजभूषण पुरस्कार 2026’ देवून सन्मानीत करण्यात आले. ही मोताळा शहरासाठी गौरवाची बाब असून संतोष इंगळे यांचे सर्वत्र कौतूक होत आहे.



























