मोताळा-नुकत्याच जाहीर झालेल्या जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेच्या निकालात, तालुक्यातील पान्हेरा खेडी जिल्हा परिषद हायस्कूलच्या इय्यता पाचवीची विद्यार्थीनी कु. स्वरा नागेश तोडकर हीने गुणवत्ता यादीत 31 वा क्रमांक मिळवून दैदीप्यमान यश संपादन केले आहे. स्वराची ‘जवाहर नवोदय विद्यालया’साठी निवड झाल्याने तीचे कौतूक होत आहे.
स्वरा तोडकरने अत्यंत कठीण समजल्या जाणाऱ्या या परीक्षेत स्वराने आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर यश मिळवून शाळेचा आणि गावाचा नावलौकिक वाढवला आहे. स्वराला तिच्या या यशासाठी तिचे वर्गशिक्षक जितेंद्र रामभाऊ मोरे, मुख्याध्यापिका सौ. ज्योती पाटील, सौ.सावळे मॅडम, सुनील तांबेकर, प्रल्हाद माठे, लक्ष्मण फदाट , गजानन चिंचोले स्वराचे आई आणि वडील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. यशाबद्दल शाळेचे शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष शशिकांत राहणे,उपाध्यक्ष अनिल जाधव, Adv.गणेशसिंह राजपूत, माजी गटशिक्षणाधिकारी मनोहर धंदर ,.डी. डी.पाटील ,महावीर जैन, केंद्रप्रमुख गजेंद्रसिंग अवचार, विनय वैराळकर,रामभाऊ गाळणे, बंटी पाटील आणि ग्रामस्थांनी स्वराचे कौतूक केले. स्वराच्या या यशामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.



























