धा.बढे राजे शिवाजी माध्यमिक विद्यालयात विद्यार्थी करिअर मार्गदर्शन मेळावा
मोताळा: यश कठोर परिश्रमानंतर मिळते. यश मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांनी नियोजनबध्द पध्दतीने अभ्यास केल्यास तो यशस्वी होतो. पुर्वी विद्यार्थ्याना जे ज्ञान दहावीत मिळत होते, ते आता मोबाईलच्या युगात पाचवीतील विद्यार्थ्यांना मिळत आहे. फाईव्ह जीच्या युगात विद्यार्थ्यांना मोबाईलमुळे मोठा फायदा होत आहे. मात्र, विद्यार्थ्यांनी मोबाईलचा वापर शैक्षणिक कार्यासाठी करावा. शालेय जीवनात शिक्षण घेतांना जीवनाचे ध्येय समोर ठेवून विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा, असे मार्गदर्शन जिल्हा परिषद सीईओ गुलाबराव खरात यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना केले.
मोताळा तालुक्यातील बालशिवाजी प्राथमिक व राजे शिवाजी माध्यमिक विद्यालय धा.बढे येथे 11 जानेवारी रोजी विद्यार्थ्यांसाठी पोलिस भरती, तलाठी भरती, रेल्वे भरती, आरोग्य भरती, एमपीएससी, युपीएससी, ग्रामसेवक, टीईटी, शिक्षक भरती इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी करीअर मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात बोलत होते. पुढे बोलतांना त्यांनी विद्यार्थ्यांनी मोबाईलचा चांगल्या कामास उपयोग केल्यास शैक्षणीक गुणवत्ता वाढते. कुठलेली माहिती सहज मिळविता येते. मात्र विद्यार्थी सोशल मिडीयावर रिल्स बनविण्यात व्यस्त असल्याने ते आपला अमूल्य वेळ वाया घालत असून स्वत:ची फसवणूक करुन घेत आहे. विद्यार्थ्यांनी चांगली माहिती मिळविण्यासाठी मोबाईलचा उपयोग करावा, असे सांगितले. तर जळगाव खांदेश दर्जी फाऊंडेशनचे प्रा.गोपाल दर्जी पाटील यांनी विद्यार्थ्यांनी मोठे स्वप्न बघून उपयोग नाही, ते पुर्ण करण्यासाठी इच्छाशक्ती असावी लागते. इच्छाशक्ती असल्यास कोणतीही गोष्ट अशक्य नाही. जिद्द व चिकाटीने अभ्यास केल्यास अधिकारी होणे कठीण नाही, असे ते म्हणाले. प्रास्ताविकामध्ये प्रदीप पाटील यांनी डॉ.निलेश मधुकर राणे राष्ट्रीय उपाध्यक्ष भारतीय क्रीडा विकास व पदोन्नती महामंडळ, दिल्ली राज्यमंत्री (सं) राष्ट्रीय गुन्ह नियंत्रण मंडळ, दिल्ली यांची व त्यांच्या निलेश राणे युवा प्रतिष्ठानच्या कार्याबद्दल सांगितले. कार्यक्रमाचे आयोजन विजय साबळे, पाटील एनजीओ दर्पण व निती आयोग, भारत सरकार निलेश राणे युवा प्रतिष्ठान मुंबईचे बुलढाणा जिल्हाअध्यक्ष यांनी केले होते.
अधिकारी व पत्रकारांचा निलरत्न पुरस्काराने सन्मान
निलेश राणे युवा प्रतिष्ठान अध्यक्ष डॉ.निलेश मधुकर राणे यांच्या हस्ते जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात, जळगावचे गोपाल दर्जी पाटील, मोताळा तहसिलदार हेमंत पाटील, बोराखेडी पोलिस निरिक्षक सारंग नवलकार, धा.बढे ठाणेदार नागेश जायले, केंद्र प्रमुख हिरासींग धिरबस्सी, ग्राम महसूल अधिकारी सुनिल एंडोले, प्रा.शांताराम चव्हाण नवजीवन हायस्कूल रोहिणखेड, बाल शिवाजी संस्थापक अध्यक्ष नाना कानडजे, कु.ओजस्वी अमर कुळे यांना राज्यस्तरीय निलरत्न तर जिल्हास्तरीय निलरत्न पुरस्कार देशोन्नती उपसंपादक संजय शिराळ, दैनिक लोकमत तालुका प्रतिनिधी गणेश राठी, दिव्य मराठी तालुका प्रतिनिधी हमीद कुरेशी, पुण्यनगरी तालुका प्रतिनिधी विष्णु शिराळ, सकाळ तालुका प्रतिनिधी शाहिद कुरेशी यांना सन्मानीत करण्यात आले. कार्यक्रमाचे बहारदार सुत्रसंचालन सपना दिनेश कानडजे यांनी केले. यशस्वीतेसाठी बाल शिवाजी विद्यालय धा.बढे प्रा.डी.एन.कानडजे व शिक्षकवर्ग व कर्मचारी यांनी यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.