सरोदे पाटील तुम्ही नांदचं केलायं थेट; तुमची माणूसकी आमदार, खासदारापेक्षाही ग्रेट !

4378

‘न भुतो, न भविष्यती’ केले मुलीचे लग्न…!
माणसासह मुक्या प्राण्यांना सुध्दा दिले लग्नात जेवण !!

BNU न्यूज नेटवर्क..
मोताळा (8.May.2023): विवाह म्हटलं की दोन जीवाचे पवित्र मिलन, जोडी स्वर्गात ठरलेली असते, त्यांचा आई-वडिल, भावुकी यांच्याकडून सहयोग जुळून आणल्या जातो. असचं काहीतरी मोताळा तालुक्यातील कोथळी गावात घडलं…! ‘अन्न हे पुर्णब्रम्ह’ला साद देत, प्रकाश सरोदे पाटील यांनी नादंच केलायं तो सुध्दा थेट, की त्यांच्या मुलीच्या लग्नाची दिवसभर जिल्हाभर चर्चा होती…! माणसासह, मुक्या जनावरांना, जमिनीवरील सुक्ष्म जिवांना जेवण देण्याची, कदाचीत हे लग्न बुलढाणा जिल्ह्यातील पहिलेच लग्न असेल, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही!

कोथळी येथील शेतकरी प्रकाश हरीचंद्र सरोदे यांच्या चिसौका.पुजा नावाच्या मुलीचा विवाह शिरवा येथील रमेश नामदेव दिवाणे यांचा मुलगा चि.अतुल यांच्यासोबत आज 7 मे रोजी सायंकाळी 6 वाजेनंतर संपन्न झाला. त्यासाठी 4 एकरावर भव्य मंडप टाकलेला होता, असं वाटत होत की, आमदार, खासदाराच्या मुलींचे लग्न आहे. पण लग्न होते ते जगाचा पोशिंद्या शेतकऱ्याच्या मुलीचे..! या लग्नाची दिवसभर चर्चा होती, ती भव्य मंडपामुळे नव्हे तर प्रकाश सरोदे यांची ‘अन्न हे पुर्णब्रम्ह’असलेल्या श्रध्देवर अन् त्या श्रध्देपोटी त्यांनी मुलीचे कन्यादान करायचे तर गाव व परीसरातील कोणत्याहा माणूस उपाशी राहू नये, हे झालं माणसाबद्दलचं प्रेम…! एवढ्यावरच सरोदे पाटील थांबले नाही, त्यांनी जे पशुधन शेतकऱ्याला सुख-दु:खात साथ देते त्यांच्यासाठी 3 ट्राली कुटार व 10 क्विंटल ढेप, सुक्ष्म जीव मुंग्या व इतर जीवांसाठी झाडाभोवती साखर टाकून त्यांचा सुध्दा त्यांनी विचार केलायं, इमानदार प्राणी म्हणून ओळख असलेल्या कुत्र्यांची व जनावरांची पंगत बसवून त्यांना पोटभर जेवण दिले, हे झाले प्राण्याबद्दल त्यांनी सर्व जातीधर्मातील लोकांच्या चुली बंद ठेवून 10 हजार लोकांना जेवण देवून ‘अन्न हे पुर्णब्रम्ह’ आहे म्हणून त्याची परतफेड म्हणून कुणाकडून ‘अहेर’ म्हणून दमडीही घेतली नाही, हे विशेष !

शेतकऱ्याच्या मुलीचा शाही विवाह..

कोथळी ह्या छोट्याशा गावात 4 एकरावर थाटलेला मंडप पाहण्यासाठी अनेकांनी उपस्थिती लावली. मंडप तर भव्य होताच, परंतु सरोदे पाटील यांची पशु,पक्षी, प्राणी यांच्यावरील असलेली दया कितीतरी पटीने मोठी होती. अनेकांना वाटत होते की, आपण सत्य युगात असून कदाचीत हा प्रसंग सत्य युगातील तर नाही ना..? परंतु हा प्रसंग कलीयुगातील कोथळी येथील शेतकरी प्रकाश सरोदे पाटील यांच्या मुलीच्या शाही लग्नातील होता, हे विशेष !

‘अन्न पुर्णब्रम्हचं’ अहेरला दिली चपारक !

खरचं अन्नदान करायचे तर मग दिलखुशपणे करायचे, याचा प्रत्येय प्रकाश सरोदे यांनी आणून दिला. मुंग्या, कुत्री, जनावरे व सर्व धर्म, जातीतील लोकांना अन्नदान करुन ‘अन्न हे पुर्णब्रम्ह’ आहे याचा प्रत्येय देत ‘अहेर’ या पध्दतीला चपारक दिली आहे.