डॉ. शिवाजी देशमुख यांची आंतरराष्ट्रीय शिक्षक प्रशिक्षण अभ्यासक्रम समितीवर निवड

262

अभय जंगम
बुलढाणा(BNUन्यूज) बुलढाणा जि. प. हायस्कूल साखळी बु. येथील उपक्रमशील फुलब्राईट स्कॉलर शिक्षक डॉ. शिवाजी देशमुख यांची ‘पीडी:के-12’ प्रोफेशनल डेव्हलपमेंट केजी ते बारावी पर्यंत शिक्षक प्रशिक्षणामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर अग्रगण्य असलेल्या अमेरिकेतील संस्थेमध्ये शिक्षक अभ्यासक्रम विकसन समितीवर निवड झाली आहे.

पीडीके यांनी जगभरातील विविध स्कॉलर शिक्षकांकडून अभ्यासक्रम समितीवर काम करण्यासाठी आवेदन मागविले होते. त्यामध्ये डॉ. शिवाजी देशमुख यांचे आवेदनपत्र, शिक्षण-प्रशिक्षण उपक्रमामधील त्यांचे योगदान व मुलाखत यां माध्यमातून निवड होवून सध्या ते ‘अतिथी शिक्षकांसाठी’ अभ्यासक्रम तयार करण्यासाठी मुल्यमापन समितीमध्ये आंतरराष्ट्रीय शिक्षण तज्ञ म्हणून योगदान देत आहेत. भारतीय प्रमाण वेळेनुसार रात्री 20 ते सकाळी 02 वाजेपर्यंत सदर प्रशिक्षण घटकसंचाच्या विकसन व मुल्यमापन प्रक्रियेमध्ये दिलेल्या योगदानाबद्दल सदर संस्थेने डॉ. शिवाजी देशमुख यांचा प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. निवडीबद्दल शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांचे सर्वत्र कौतूक होत आहे.