Saturday, April 4, 2026
Home Breaking News दूध घेण्याच्या क्षुल्लक कारणावरुन ‘बायकोचा नवऱ्यावर’ चाकू हल्ला; मोताळा सर्वेश्वर नगर येथील...

दूध घेण्याच्या क्षुल्लक कारणावरुन ‘बायकोचा नवऱ्यावर’ चाकू हल्ला; मोताळा सर्वेश्वर नगर येथील घटना; पत्नीवर गुन्हा दाखल!

30

मोताळा: नवरा बायकोची अतूट जोडी स्वर्गातून निर्माण होते, असे म्हटले जाते. वटपौर्णिमेला बायको नवऱ्याच्या लंब्या आयुष्यासाठी वडाची पुजा करते. मात्र, मोताळा येथील सर्वेश्वर नगर प्रभाग क्र.15 मध्ये विपरीत घडलंय. बायकोने नवऱ्याच्या मांडीवर क्षुल्लक कारणावरुन चाकूने जीवघेणा हल्ला केल्याची घटना गुरुवार 5 फेब्रुवारी रोजी सकाळी 8.45 वाजेच्या सुमारास घडली. बोराखेडी पोलिसांनी हल्लेखोर पत्नीवर गुन्हा दाखल केला आहे.

महिलांवर अन्याय, अत्याचार झाल्याच्या घटना एैकायला मिळतात. महिला सुरक्षीत नाही, अशी ओरड होते. मात्र, मोताळा शहरातील प्रभाग क्र.15 मधील सर्वेश्वर नगर येथे 5 फेब्रुवारीच्या सकाळी पती व पत्नीमध्ये दूध घेण्याच्या कारणावरुन वाद उफाळून आला.. वाद एवढ्या स्तराला गेला की, पत्नीने पतीवर चाकूने हल्ला करीत त्याला गंभीर जखमी केला. पती रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. ही घटना ऐकून देखील अंगावर शहारे येतात. सविस्तर घटना अशी आहे की, बुलढाणा तालुक्यातील बोरखेड येथील फोटोग्राफर मंगेश आनंदा गवळी (वय 30) व त्याची पत्नी प्रिया मंगेश गवळी (वय 21) हे मोताळा शहरातील सर्वेश्वर नगर प्रभाग क्र.15 मध्ये राहतात. मंगेश गवळी हा फोटोग्राफर असून तो फोटोग्राफी करतो. गुरुवार 5 फेब्रुवारी रोजी मंगेशची पत्नी प्रिया गवळी यांच्यामध्ये दूध घेण्याच्या क्षुल्लक कारणावरुन मोठा वाद झाला. यावेळी प्रिया गवळीने रागाच्या भरात घरातील चाकूने पती मंगेश गवळी याच्यावर जीवघेणा हल्ला चढवित चाकू त्याच्या उजव्या मांडीत खुपसून त्याला गंभीर जखमी केले. मंगेश जखमी झाल्याने वेदनेने तो किंचाळीत होता. मात्र, त्याची बायको त्याला शिविगाळ करीत जीवे मारण्याची धमकी देत होती, अशा मंगेश गवळी याच्या फिर्यादीवरुन बोराखेडी पोलिसांनी मंगेशची पत्नी प्रिया मंगेश गवळी हीच्यावर भारतीय न्याय संहिता 2023 कलम 352, 351(2) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास पोलिस उपनिरिक्षक राजेंद्र कपले हे करीत आहे. या घटनेमुळे मोठी दहशत निर्माण झाली.
Don`t copy text!