मोताळा: तालुक्यातील अंत्री येथे एका 24 वर्षीय युवकाने स्वत:च्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. सदर दुदैवी घटना आज सोमवार 9 मार्च रोजी दुपारी सव्वाचार वाजेच्या सुमारास उघडकीस आली. मृतक युवकाचे नाव तेजस मोहन जवरे असे आहे.
अंत्री येथील चंद्रकांत रविदास जवरे यांनी आज 9 मार्च रोजी बोराखेडी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, त्यांचा पुतण्या तेजस मोहन जवरे (वय 24) याचे शिक्षण सुरु असून तो शेती सुध्दा करतो. दुपारी सव्वाचार वाजेच्या सुमारास फिर्यादीस त्यांची पुतणीने फोन करुन तेजसने गळफास घेवून आत्महत्या केल्याची फोनवरुन माहिती दिली. लगेच फिर्यादी हे बोराखेडी येथून दुचाकीने घरी गेले. घरात पाहिले असता पुतण्या तेजस त्याच्या घरात दोरीच्या सहाय्याने सिलींग फॅनला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. बोराखेडी पोलिसांनी मर्ग दाखल केला आहे. पुढील तपास पोहेकाँ.अमोल खराडे हे करीत आहे. तेजसने आत्महत्या का केली? हे मात्र समजू शकले नाही.


























