मोताळा- तालुक्यापासून सहा किमी.अंतरावर असलेल्या टाकळी (वाघजाळ) येथे एका २९ वर्षीय शेतकरीपूत्राने कर्जबारीपणा व आजाराला कंटाळून आत्महत्या केली. सदर दुदैवी घटना आज मंगळवार १० मार्च रोजी उघडकीस आली. मृतकाचे नाव अंकुश प्रल्हाद हरमकार असे आहे.
मिळालेल्या माहितीनुसार बोराखेडी पोस्टे.हद्दीतील टाकळी (वा) येथील रहिवासी शेतकरीपूत्र अंकुश प्रल्हाद हरमकार (वय २९) यांचे गट नं.१९७ मध्ये १.३३ शेती आहे. आई-वडिल वारलेले असून अंकुश जुडवा भावासोबत राहतो. घरातील कर्तापुरुष, त्यातच शेतीचा वाढता खर्च व आलेले उत्पन्न कमी.त्यातच आजारापणाला लागणारा खर्च व बँकेचे कर्ज या विवंचनेत अंकुश हरमकार यांनी आज सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घरात दोरीच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. त्यांच्या शेतीवर रोहिणखेड महाराष्ट्र बँक शाखेचे ५० हजाराचे कर्ज असल्याची माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती पोलिस पाटील सुरेंद्र शिराळ यांनी बोराखेडी पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच बोराखेडी पोस्टे. जमदार बळीराम खंडागळे व त्यांचे रायटर शेख इसाक यांनी येऊन पंचनामा केला. मृतकाच्या पश्चात भाऊ,वहिणी व चार विवाहित बहिणी आहेत.घरातील कर्ता पुरुष गेल्याने हरमकार कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.


























