बुलढाणा- जिल्हा रुग्णालय, बुलडाणा येथे दर शुक्रवारी नियमितपणे नेत्र, मतिमंद/मनोरुग तसेच कान-नाक-घसा संबंधित दिव्यांग तपासणीसाठी विशेष बोर्ड आयोजित केला जातो. मात्र येत्या 3 एप्रिल रोजी ‘गुड फ्रायडे’ निमित्त शासकीय सुट्टी असल्याने या दिवशी होणारे दिव्यांग तपासणी शिबिर रद्द करण्यात आले आहे.
सदर दिवशी (पहिला शुक्रवार) नेत्र, मतिमंद/मनोरुग व कान-नाक-घसा संबंधित दिव्यांग तपासणी होणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे नागरिकांनी शुक्रवार 3 एप्रिल रोजी जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी येऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे. तरीही कोणी नागरिक तपासणीसाठी आले, तर होणाऱ्या गैरसोयीस प्रशासन जबाबदार राहणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.



























