BNU न्यूज नेटवर्क..
बुलढाणा (Date.21 Jan.2023) जगदगुरू नरेंद्राचार्यजी महाराज संस्थानच्या अंधश्रध्दा निर्मुलन उपक्रमांतर्गत अंनत श्री विभुषीत जगदगुरू रामानंदाचार्य स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज, जगदगुरू रामानंदचार्य दक्षिण पीठ नाणीजधाम यांच्या पादुका दर्शन सोहळ्याचे शनिवार 28 जानेवारी रोजी लहाने ले आऊट, चिंचोले चौक, सर्क्युलर रोड, बुलढाणा येथे सकाळी 9 वाजता आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाच्या अनुषंगाने संस्थानच्या वतीने अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात जसे की, ग्रामस्वच्छता अभियान, शैक्षणिक उपक्रमांतर्गत इंग्रजी माध्यमांची मोफत शाळा, वैद्यकीय उपक्रमांतर्गत मोफत दवाखाना, मोफत रूग्णवाहिका सेवा- महाराष्ट्रात विविध महामार्गावर 37 रूग्णवाहिका 24 तास अखंडपणे अपघातग्रस्तांच्या सेवेत कार्यरत आहेत. आर्थिकदृष्ट्या, आपातकालीन मदत उपक्रम, कायदेविषयक साक्षरता शिबिरे, ब्लड इन नीड, रक्तदान शिबिरे आयोजित केली जातात. या कार्यक्रमासाठी बुलढाणा जिल्ह्यातील सर्व जिल्हा सेवा समिती, तालुका प्रमुख सेवा समिती सदस्य, व सर्व सेवाकेंद्र सदस्य, आरती केंद्र सदस्य व भाविक भक्त, साधक शिष्यांनी 28 जानेवारी रोजी जगदगुरू नरेंद्राचार्यची महाराज यांच्या पादुकांचे गुरूपुजन करण्यासाठी तसेच उपासक दिक्षा घेण्यासाठी बुलढाणा येथे उपस्थित रहावे. पादुका दर्शन सोहळ्यासाठी येणा-या भाविकांसाठी कार्यक्रमाच्या दिवशी सामाजिक उपक्रम अंतर्गत दुर्बल घटकांना घरघंअीचे वाटप मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. तसेच महाप्रसादाची व्यवस्थासुदधा केलेली आहे. तरी या महमंगल समयी सर्व भाविकांनी उपस्थित राहुन परम पूज्य जगदगुरू श्रींच्या प्रवचनाचा व दर्शनाचा अवश्य लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा निरिक्षक, जिल्हा सेवा समिती सदस्य व तालुका अध्यक्ष जिल्हा सेवा समिती पदाधिकारी पीठ प्रमुख कुंडलिकराव वायभासे, पीठ सहप्रमुख देवेंद्र दलाल, व्यवस्थापक सुरेश मोरे, निरिक्षक सौ. लता चिंचोले, जिल्हा अध्यक्ष संतोष दसरे यांच्यावतीने करण्यात आले आहे.