प्रेमविवाह वैशालीच्या जीवावर बेतला; पतीने मर्डरचा केला! आरोपी पतीस जन्मठेप तर सासु सासऱ्यास 3 वर्ष सक्षम कारावासाची शिक्षा

304

बुलढाणा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश स्वप्नील खटी यांचा निकाल

BNU न्यूज नेटवर्क..
बुलढाणा(Date.21 Jan.2023)- प्रेम करणे काही गुन्हा नाही..प्रेमाचे रुपांतर लग्नात झाले, परंतु ज्याच्यावर विश्वास ठेवला त्यानेच स्वत:च्या पत्नीचा मर्डरच केल्याची घटना सन 2018 मध्ये म्हणजे पाच वर्षापुर्वी शिवशंकर नगर बुलढाणा येथे घडली होती. सदर प्रकरणात बुलढाणा न्यायालयात दाखल करण्यात आले होते. पत्नी वैशालीच्या हत्येप्रकरणी गुन्हा सिध्द झाल्याने आरोपी पती राहुल शंकर कांबळे याला जन्मठेपेची शिक्षा तर सासरे शंकर कांबळे व सासु मंदाबाई कांबळे हीने शारिरीक व मानसिक त्रास दिल्याचा गुन्हा सिध्द झाल्याने त्यांना 3 वर्ष सक्षम कारावास व दीर सचिन कांबळे व नितीन कांबळे यांच्याविरुध्द पुरावा न मिळून आल्याने त्यांना निर्दोष सोडण्यात आले आहे. हा महत्वपूर्ण निकाल प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश स्वप्नील खटी साहेबांनी पारीत केला आहे.

पाच वर्षापुर्वी काही विपरीत घडलं होतं..याबाबत वैशाली कांबळे हीची आई निर्मलाबाई निकाळजे रा.पळसखेड भट ता.बुलढाणा यांनी बुलढाणा शहर पोस्टे.ला फिर्यादी दिली होती की, 30 ऑगस्ट 2018 रेाजी त्यांना फोनद्वारे माहिती देण्यात आली, त्यांची मुलगी वैशाली हिला राहते घरी मारहाण झाल्यामुळे तिची तब्येत गंभीर असून तिला सरकारी दवाखान्यात भरती केले आहे व त्यानंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषीत केले. त्यांची मुलगी वैशाली हीचा राहुल शंकर कांबळे शिवशंकर नगर बुलढाणा याच्यासोबत प्रेमविवाह रजि.पध्दतीने झालेला होता. राहुलने वैशालीस लग्नानंतर 1 वर्ष चांगले वागविले त्यानंतर त्यास दारूचे व्यसन लागले व तो कामधंदा सुध्दा नव्हता व वैशालीस माहेरून पैसा आणण्यासाठी तगादा लावून तिला मारहाण करीत होता. तर वैशालीस तिची सासू सौ.मंदा शंकर कांबळे व सासरा शंकर कांबळे हे सुध्दा शारीरिक व मानसीक छळ करून तिला माहेरून पैसा आणण्याकरीता तगादा लावत होते. याप्रकरणी वैशालीचा पती आरोपी राहुल शंकर कांबळे, सासू सौ.मंदाबाई शंकर कांबळे, सासरा शंकर कांबळे, दीर सचिन शंकर कांबळे व नितीन शंकर कांबळे रा.शिवशंकर नगर बुलढाणा यांच्या विरूध्द बुलडाणा शहर पोस्टे येथे उपरोक्त आरोपींवर कलम 302,109,201,498 अ, सहकलम 34 गुन्हा दाखल करण्यात आला होता. सहा. पोलीस निरीक्षक राजेश यादव यांनी गुन्ह्याचा तपास करून दोषारोपपत्र बुलडाणा येथील न्यायालयामध्ये दाखल करण्यात आले हेाते.

सरकारी वकील अ‍ॅड..संतोष खत्री बुलढाणा यांनी सदर प्रकरणामध्ये सरकार पक्षातर्फे एकूण 15 साक्षीदार तपासून जोरादार युक्तीवाद करुन बाजू मांडली. गुन्हा सिध्द झाल्याने प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश स्वप्नील सी.खटी बुलडाणा यांनी आरोपी राहुल शंकर कांबळे याला कलम 302 नुसार सश्रम जन्मठेपेची शिक्षा व 10 हजार रुपयांचा दंड ठोठाविला तसेच राहुल शंकर कांबळे व शंकर दौलत कांबळे व सौ.मंदाबाई शंकर कांबळे यांना कलम 498-अ सहकलम 34 भा.दं.वि. नुसार 3 वर्षाची सश्रम कारावासाची शिक्षा व प्रत्येकी 5 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनाविली तर आरोपी सचिन शंकर कांबळे व नितीन शंकर कांबळे यांच्याविरूध्द पुरावा न मिळून आल्यामुळे त्यांना निर्दोष सोडण्यात आले. कोर्ट पैरवी अधिकारी पोहेकाँ. किशोर कांबळे पो.स्टे.बुलडाणा शहर यांनी सहकार्य केले.