मुलीच्या लग्नाच्या पत्रिका वाटतांना वडील अपघातात ठार !

4088

बुलढाणा रोडवरील मुर्ती फाट्याजवळील दुदैवी घटना

BNU न्यूज नेटवर्क..
मोताळा (25.Apr.2023) कुऱ्हा गोतमारा येथील काशीराम मंझा हे आपल्या मुलीच्या लग्नाच्या पत्रिका वाटून दुचाकी क्र.एम.एच.28 अेजी-691 ने खैरखेड येथून घरी परत येत असतांना त्यांना बुलढाणा मलकापूर रोडवरील पेपर मिल जवळील वळणावर आज मंगळवार 25 एप्रिल रोजी सायंकाळी 6.30 वाजेच्या दरम्यान ट्रक व दुचाकीची भिषण धडक झाली. यामध्ये काशिराम मंझा हे जागीच ठार झाले असून त्यांना 108 वाहनाने बुलढाणा येथे हलविण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

विवाह म्हणजे दोन जिवांचे पवित्र मिलन असते, त्याला हिंदू धर्मामध्ये एक संस्कार सुध्दा मानल्या जातो. अनेकांना वाटते आपल्या डोळ्यासमोर आपल्या मुलीचे लग्न व्हावे, अशी इच्छा असते. मोताळा तालुक्यातील कुऱ्हा गोतमारा येथील 52 वर्षीय काशिराम मंझा यांच्या मुलीच्या लग्नाची जोरदार तयारी चालू होती. लग्न ऐन 2 दिवसावर म्हणजे 27 एप्रिलला आहे. काशीराम मंझा मुलीच्या लग्नाच्या पत्रिका वाटून आपल्या दुचाकी क्र.एम.एच.28 अेजी-691 वाहनाने परत येत असतांना मुर्ती फाटा दरम्यान आज 25 एप्रिल रेाजी परत येत असतांना बुलढाणाकडे जाणाऱ्या ट्रक व मंझा यांच्या दुचाकीची भिषण धडक होवून यामध्ये काशीराम मंझा यांचा जागेवरच मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, 2 मुले, 2 मुली असा बराच मोठा आप्त परिवार आहे