Wednesday, May 6, 2026
Home Buldana धा.देशमुख येथील युवकाची गळफास घेवून आत्महत्या

धा.देशमुख येथील युवकाची गळफास घेवून आत्महत्या

106

मोताळा : तालुक्यातील धामणगाव देशमुख येथील एका २८ वर्षीय युवकाने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना आज बुधवार १३ नोव्हेंबर रोजी सकाळी पावणेपाच वाजेच्या सुमारास उघडकीस आली. युवकाचे नाव जितेश दशरथ इंगळे असे आहे.

बोराखेडी पोलिस स्टेशन हद्दीतील धामणगाव देशमुख येथील दशरथ लक्ष्मण इंगळे यांनी बोराखेडी पोलिसात फिर्याद दाखल केली की, त्यांचा मुलगा जितेश इंगळे (वय २८) याने रामगाव तांडा शिवारातील स्मशानभूमी रोडलगत १२ नोव्हेंबरच्या रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास गुलमोहरच्या झाडाच्या फांदीला दोरीच्या सहायाने गळफास घेवून लटकलेल्या अवस्थेत आढळून आल्याच्या फिर्यादीवरुन बोराखेडी पोलिसांनी मर्ग दाखल केला आहे. पुढील तपास बोराखेडी पोलिस करीत आहे.

 

Don`t copy text!