बुलढाणा येथे राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये १२२९२ प्रकरणांचा निपटारा; 17 कोटी 12 लक्ष रु.चा दंड वसूल !

318

BNU न्यूज नेटवर्क..
बुलढाणा (30.Apr.2023) राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या आदेशान्वये जिल्हा विधी सेवा प्राधिकरण बुलढाणा तथा वकील संघ बुलढाणा यांच्या संयुक्‍त विद्यमाने आज रविवार 30 एप्रिल रोजी बुलढाणा जिल्हयातील सर्व न्यायालयामध्ये राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये १२ हजार २९२ प्रकरणे निकाली काढण्यांत आली. त्यापोटी १७ कोटी १२ लक्ष ४४ हजार ६१७ रुपये तडजोड शुल्क व दंड म्हणून वसूल करण्यात आला.

बुलढाणा जिल्हयात राष्ट्रीय लोकअदालतमध्ये बॅक तसेच वाहतूक शाखा आणि महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी यांचे दाखलपूर्व प्रकरणे ४० हजार ३३४ दाखल झाले होते त्यापैकी ११ हजार ६५६ प्रकरणे निकाली निघाली असून ४ कोटी ५२ लक्ष ८६ हजार ८४५ रुपये तडजोड शुल्क वसूल करण्यात आले. तर न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे ६३९५ ठेवण्यांत आले असून त्यापैकी ६३६ प्रकरणे निकाली काढण्यात आली असून एकूण १२ कोटी ५९ लक्ष ५७ हजार ७७२ रुपये तडजोड शुल्क वसूल करण्यात आले. बुलढाणा जिल्ह्यात असे एकूण ४६०७२९ प्रकरणे ठेवण्यात आलीत तर एकूण १२२९२ प्रकरणे निकाली काढण्यात येवून एकूण १७ कोटी १२ लक्ष ४४ हजार ६१७ रुपये तडजोड शुल्क व दंड म्हणून वसूल करण्यात आला.

स्वप्नील.चं.खटी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश बुलढाणा तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण बुलढाणा यांच्या मार्गदर्शनाखाली आर.एन मेहरे, जिल्हा न्यायाधीश-1 बुलढाणा, श्रीमती.एच.एस.भोसले, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर बुलढाणा. श्रीमती.एस.आर गायकवाड, मुख्य न्यायदंडाधिकारी, बुलढाणा, .डी.पी.काळे, ३ रे दिवाणी न्यायाधीश वरीष्ठस्तर, बुलढाणा, .डब्ल्यू.डी.जाधव, सह दिवाणी न्यायाधिश क.स्तर, बुलढाणा असे एकूण ५ पॅनल तयार करण्यात आले होते. सदर पॅनलवर अ‍ॅड.एस ए.डिने, अ‍ॅड..एस.एन पांचाळ, अ‍ॅड..एस.टी टेकाळे, अ‍ॅड..ए. एच.अंभोरे, अ‍ॅड..एस.टी इंगळे यांनी सहाय्यक पंच म्हणून तर अ‍ॅड. एस.एस.तायडे यांनी चौकशी विभागाचे काम पाहीले.