गुम्मीत महिलांनी पोलिसांना दिली अवैध दारु पकडून !

1055

दारु बंद न झाल्यास महिलांचे 4 मे ला एसपींच्या कार्यालयासमोर आत्मदहन आंदोलन

BNU न्यूज नेटवर्क..
बुलढाणा (2.May.2023) जिल्ह्यात ग्रामीण भागात जवळपास ‘गाव तेथे दारु’ दुकान सुरु असल्याची चर्चा असून दारुमुळे शाळकरी मुले सुध्दा मोठ्या प्रमाणात व्यसनाधिन होत आहे. अनेक दारुड्या युवकांमुळे संपूर्ण कुटूंबाचे कुटूंब उध्दवस्त होत आहे. बुलढाणा तालुक्यातील गुम्मी येथील महिलांनी जिल्हा पोलिस अधिक्षक, जिल्हाधिकारी व राज्य उत्पादन शुल्क विभागाला आज 2 मे रोजी शेकडो महिला व पुरुषांच्या वतीने निवेदन देवून गावातील दारु विक्री बंद करण्याची मागणी करण्यात आली. पोलिस गावात आले असता त्यांना दारु दिसली नसल्याने महिलांनी रौद्रावतार धारण करुन पोलिसांना दारुच्या बाटल्याच पकडून दिल्याने, महिलांचे गुम्मीसह परिसरात कौतूक होत आहे.

बुलढाणा तालुक्यातील गुम्मी येथे राजरोसपणे अवैध देशी व गावठी दारू मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे. दारु बंदीसाठी ग्रामसभेने सर्वानुमते ठराव पास करून गावातील अवैध देशी व गावठी दारू विक्री तात्काळ बंद करावी असा निर्णण घेतला. त्याच्या प्रति सुध्दा संबंधित विभागांना देण्यात आल्या. गुम्मी येथे २०२० पर्यंत गावातील तरुणाचे शासकीय व खाजगी नोकरी लागण्याचे प्रमाण जास्त होते. परंतु २०२0 पासून गावामध्ये मोठ्या प्रमाणात देशी व गावठी दारूचे दुकाने थाटलेली असलल्याने तरुण पिढी व्यसनाच्या आहारी गेल्याने सन २०२१ पासून शासकीय नोकरी (पोलीस व सैन्यामध्ये) लागण्याचे प्रमाण खूपच कामे झालेले आहे. गावात सुरु असलेल्या अवैध बोगर देशी व गावठी दारूमुळे अनेक कुटुंब उदध्वस्त होवून अनेक कुटुंबामध्ये दररोज वाद होवून वादाचे रूपांतर तीव्र स्वरूपाच्या भांडणामध्ये होतात. काही तरुणांनी दारू पिऊन मागील आठवड्यात वृध्द आई-वडिलांना मारहाण देखील केली होती. तशी लेखी तक्रार धाड पोलीस पोस्टे.ला देण्यात आली आहे. याबाबत धाड पोलिसांना कळवून देखील ढेपाळलेले धाड पोलिस प्रशासन काहीच करीत नसल्याचा आरोप महिलांनी केला आहे.

गुम्मी येथे दारु विक्रेते राजरोसपणे अवैध दारु भर रस्त्वावर व जि. प. शाळेजवळ विकी चालू केल्याने विद्यार्थ्यांच्या मनावर विपरीत परिणाम होत आहे गुम्मी येथील अवैध दारु विक्री तात्काळ बंद न झाल्यास महिलांच्यावतीने 4 मे रोजी जिल्हा पोलिस अधिक्षकांच्या कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा गुम्मी येथील शेकडो महिलांच्यावतीने निवेदनात देण्यात आला आहे. निवेदनावर जया नरोटे, अनिता नेवरे, विद्या नरोटे, पुजा दांडगे, रुख्मन, सरला दोतोंडे, वंदना वाघमोडे, लक्ष्मी वरोठ, संजय सोनुने, मारोती इंगळे, ज्ञानेश्वर वडणकर, रविंद्र नरोटे, रामधन परदेशी, पंडीत नरोटे यांच्यासह शेकडो महिला व पुरुषांच्या आहेत.