विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा होणार 9 मे ला जयश्रीताई शेळके यांचा वाढदिवस !

378

महापुरुषांना अभिवादन, मोटारसायकल
रॅली, कुष्ठरोग धाममधील रुग्णांना साहित्य वाटप

BNU न्यूज नेटवर्क..
बुलढाणा (7.May.2023): महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सचिव जयश्रीताई शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवार ९ मे रोजी विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

सकाळी ७ वाजता सुंदरखेड मुख्यालय येथे महापुरुषांना अभिवादन व कार्यकर्त्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार. सकाळी 8.30 वाजता सुंदरखेड येथे महाराणा प्रताप यांना अभिवादन. सकाळी पावणे नऊ वाजता जगदंबा देवी पूजन. सकाळी नऊ वाजता जुनागाव मशीद बस बाबा दर्गा चादर चढवणे. सकाळी सव्वा नऊ वाजता जिल्हा काँग्रेस कमिटीत उपस्थिती व शुभेच्छांचा स्वीकार. सकाळी १० ते ११ दरम्यान अभिता ऍग्रो कंपनीच्या तांदुळवाडी येथील प्रोसेसिंग युनिटचे जयश्रीताई शेळके यांच्या हस्ते उदघाटन होईल. सकाळी सव्वा अकरा वाजता मलकापूर रोडवरील गौतम बुद्ध, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे पूजन व पुष्पहार अर्पण.

असे आहेत कार्यक्रम..

सकाळी साडेअकरा वाजता बुलडाणा ते वाघजाळ फाटा दुचाकी रॅली. दुपारी १२ वाजता वाघजाळ फाटा येथील विठ्ठल रुख्मिनी मंदिर पूजन. दुपारी १२. २० लालमाती (ता. मोताळा) येथे महाराणा प्रताप प्रतिमा पूजन व पुष्पहार अर्पण. दुपारी १२.३५ चावरदा (ता. मोताळा) येथील कुष्ठरोग धाम येथील रुग्णांना कपडे व फराळ वाटप. दुपारी १२. ४५ पिंपरी गवळी(ता. मोताळा) शहीद वसंतराव उबाळे स्मारक अभिवादन. दुपारी १ वाजता दिशा बचतगट फेडरेशन पिंपरी गवळी( ता. मोताळा) शाखेचे उदघाटन. रात्री ७ वाजता चिखली येथील रानवारा मंगल कार्यालयात उपस्थित राहून जयश्रीताई शेळके शुभेच्छांचा स्वीकार करणार आहेत.