निलेश जाधवांच्या नेतृत्वात काढण्यात आला भव्य ‘आक्रोश मोर्चा’
BNU न्यूज नेटवर्क..
बुलढाणा (14.JULY.2023) महाराष्ट्र राज्यामध्ये चालले तरी काय, असा प्रश्न उपस्थित करीत राज्यामध्ये दलित-मुस्लीम-अल्पसंख्यांकावरील अन्याय, अत्याचाराच्या घटनेमध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी वंचित बहुजन आघाडीच्यावतीने जिल्हाध्यक्ष निलेश जाधव यांच्या नेतृत्वात गुरुवार 13 जुलै रोजी दुपारी 2.30 वाजेच्या दरम्याने गांधी भवन ते जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य ‘आक्रोश मोर्चा’ काढण्यात आला. या मोर्चामध्ये शेकडो नागरिक व कार्यकर्ते सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी कार्यालयासमसोर प्रचंड घोषणाबाजी करुन जिल्हा प्रशासनास निवेदन देण्यात आहे.
जरीन खानचा पोलिस कोठडीत खून करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यावर 302 नुसार सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करुन आरोपीला तात्काळ अटक करुन सेवेतून बडतर्फ करण्यात यावे, 50 लाखाची आर्थिक मदत, नांदेड जिल्ह्यातील बोंढार गावच्या अक्षय भालेरावच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा, परळी तालुक्यातील कदम कुटूंबावर जीवघेणा हल्ला करणाऱ्या आरोपीवर कडक कारवाई तसेच रेणापूर येथील मातंग बांधवांचा खून करणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा, इंस्टग्राम रिलच्या आधार घेत मुस्लीम तरुणावर खोटे गुन्हे दाखल करुन त्यांना मारहाण करणाऱ्या पोलिसांवर कारवाईची मागणी, सुरेश चौहान, टीराजा सिंग कालीचरण बाबाने प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी आयोजकांवर गुन्हे दाखल करण्यात यावे, गायरान जमिनीचे पट्टे त्वरीत नियमाकुल करावे यासह आदी मागण्यांसाठी ‘आक्रोश मोर्चा’ चे वंचितचे जिल्हाध्यक्ष निलेश जाधव यांच्या नेतृत्वात करण्यात आले होते. या मोर्चात वंचितचे जिल्हा महासचिव प्रशात वाघोदे, विष्णु उबाळे, महीला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष अलकाताई जायभाये, जिल्हा उपाध्यक्ष भिमराव शिरसाठ, विधी सल्लागार अमर इंगळे, शहराध्यक्ष मिलींद वानखेडे, समाधान डोंगरे, मनोज खरात,रमेश आंबेकर,शेषराव मोरे,शेषराव बोदडे,विद्याधर गवई, संजय धुरंधर, बाळु भिसे, बबन वानखेडे,संघपाल पन्हाळ,महेन्द्र पन्हाळ,आबाराव वाघ,उमेश वानखेडे,मधुकर शिंदे,आकाश साळवे,उध्दव वाकोडे यांच्यासह शेकडो वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ता सहभागी झाले होते.