BNU न्यूज नेटवर्क..
चिखली (21.JULY.2023) सध्या जिल्ह्यात अवैध धंद्यांना मोठ्या प्रमाणात वाढले आहे, याकडे पोलिस प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. परंतु चिखली पोलिसांनी 20 जुलैच्या रात्री गुप्त माहितीच्या आधारे चिखली-खामगाव रोडवरील शेलूद येथे हॉटेल समोर एक्का बादशाह खेळणाऱ्या 10 जुगाऱ्यांना पकडून त्यांच्याकडून 28 हजार 345 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर कारवाई स.फौ.शशिकांत धारकरी व त्यांच्या पथकाने केली.
पोलिस अधिकारी शशिकांत धारकरी हे 20 जुलै रोजी रात्री चिखली पोलिस स्टेशन कर्तव्यावर असतांना त्यांना शेलूद येथे चिखली-खामगाव रोडवर हॉटेल शामसमोर एक्का बादशहा जुगार खेळत असल्याची गुप्त माहिती मिळली. स.फौ.शशिकांत धारकरी यांनी सदर घटनेची वरिष्ठांना माहिती देवून चिखली- खामगाव रोडवरील हॉटेल शाम जवळील खाली जागेत धाड टाकली असता त्यांना 10 जुगारी एका बादशाह जुगार खेळतांना आढळून आले. त्यांनी ईश्वर दिलीप सावळे यांच्याकडून नगदी 600 रुपये व व्हीवो कंपनीचा 8 हजाराचा मोबाईल, राहुल राजेंद्र पवार नगदी 500 रुपये, अभिषेक साळवे 300 रुपये, सदानंद शेळके 300 रुपये, समाधान मोरे 245 रुपये व मोबाईल 500 रुपये, विकास केसकर 350 रुपये व रेडमी कंपनीचा 4 हजाराचा मोबाईल, शेख महेमूद शेख ईस्माईल 260 रुपये नगरी व रिअलमी कंपनीचा मोबाईल 8 हजार रुपये, गणेश मदन सोळंकी 275 रुपये नगदी व 4 हजार रु.चा मोबाईल, सलिम युसुफ पठाण 360 रुपये नगदी व मोबाईल 500 रुपये तर गजानन ना.हजारे यांच्याकडून 155 रुपये नगदी व 3345 रु.चा मोबाईल एकूण नगदी 3345 रुपये व 6 मोबाईल 25 हजार असा एकूण 28 हजार 345 रु.चा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. सर्व जुगारी सदर कारवाई स.फौ.शशिकांत धारकरी व त्यांच्या पथकाने 20 जुलै रोजी रात्री 9 वाजता केली आहे.