मोताळ्यात कारने दुचाकीला उडविले; युवक गंभीर !

75

BNU न्यूज नेटवर्क..
मोताळा (23.JULY.2023)बुलढाणा-मोताळा रोडवरील डॉ.मारोडकर हॉस्पीटलमसोर चारचाकी वाहनाने दुचाकीस्वाराला सायंकाळी 4.50 वाजता जोरदार धडक दिली, यामध्ये 30 वर्षीय युवक गंभीर जखमी झाला आहे. अतिरक्तस्त्राव झाल्याने त्याला पुढील उपचारार्थ बुलढाणा येथे हलविण्यात आले आहे. सदर युवक अंत्री येथील असून त्याचे नाव अजय गजानन कासेसर असल्याची माहिती समोर आली आहे.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अंत्री ता.मोताळा येथील अजय कासेकर हा आज 23 जुलै रोजी रोहिणखेड येथून आपला भाजीपाला विकून मोताळ्याकडे परत येत असतांना त्याला बुलढाणा-मलकापूर रोडवरील बोराखेडी शिवारातील डॉ.मारोडकर हॉस्पीटल जवळ मोताळ्याकडून बुलढाणाकडे जाणाऱ्या एम.एच.48 अेके.8481 या कारने सायंकाळी 4.50 वाजता जोरदार धडक दिली. धडक एवढी भिषण होती, की त्या धडकेत अजय कासेकरच्या डोक्याला मार लागून अतिरक्तस्त्राव झाल्याने त्याला पुढील उपचारार्थ बुलढाणा येथील एका खाजगी हॉस्पीटमध्ये दाखल करण्यात आले. यावेळी कारचालकाने कार घटनास्थळी ठेवून शेतातील रस्त्याने पळ काढून फरार झाला. घटनेची माहिती मिळताच बोराखेडी पोस्टे.पोलिस कर्मचारी 5 मिनीटात घटनास्थळावर पोहचून अपघातग्रस्त कारला बोराखेडी पोस्टे.मध्ये आणण्यात आले आहे.