शेगावात कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या

50

BNU न्यूज नेटवर्क..
शेगाव- सततची नापीकी व वाढती कर्जबाजारीला कंटाळून शेगावात माळीपुरा येथील 47 वर्षीय शेतकऱ्याने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना रविवार 10 डिसेंबर रोजी सकाळी उघडकीस आली. शेतकऱ्याचे नाव श्रीकृष्ण सुखदेव लोखंडे असे आहे.

शेगाव शहरातील माळीपुरा भागातील शेतकरी श्रीकृष्ण लोखंडे यांची शेगाव शिवारात अडीच एकर शेती आहे. मागीलवर्षी नापीकी व यावर्षी अत्यल्प पावसामुळे शेतीला लावलेला खर्च सुध्दा निघाला नसल्यामुळे श्रीकृष्ण लोखंडे मोठ्या आर्थिक विवंचनेत सापडले होते. मुलांचे शिक्षण, आईचा दवाखाना, बँकेचे कर्ज कसे फेडावे या नैराश्यमुळे त्यांनी रविवार 10 डिसेंबर रोजी गळफास घेवून आत्महत्या केली. त्यांच्यावर सेंट्रल बँक ऑफ इंडिया शेगाव शाखेचे 35 हजार रुपयांचे कर्ज होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, 1 मुलगा असा आप्त परिवार आहे.