माहेरवरुन दोन लाख आणण्यासाठी विवाहितेचा छळ

46

पतीसह पाच जणांवर गुन्हा दाखल

मोताळा: लग्नात चांगले आंदण दिले नाही, चांगल्या साड्या घेतल्या नाही. प्लॅट घेण्यासाठी माहेरवरुन दोन लाख रुपये आणण्यासाठी विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पतीसह पाच जणांवर बोराखेडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

तालखेड येथील दिपाली अमोल माठे यांनी बोराखेडी पोस्टे. ला फिर्यादी दिली की, लग्नात चांगले आंदण दिले नाही, चांगल्या साड्या घेतल्या नाही. तू प्लॅट घेण्यासाठी माहेरवरुन दोन लाख रुपये आणण्यासाठी विवाहितेचा शारिरीक, मानसिक छळ केला. चापटा बुक्क्यांनी मारहाण केल्याप्रकरणी पती अमोल मोहन माठे, अंजना मोहन माठे, मोहन भिकाजी माठे रा.ढोरपगाव ता.खामगाव, निनाजी माठे, संगीता माठे रा.शेगाव यांच्याविरुध्द भादंवीचे कलम 498, (अ), 323, 504, 34 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.