युवकाचा खून कोणी केला? सस्पेन्स वाढले !

45

खुनाचा गुन्हा दाखल;मारेकऱ्यांना पडकणे पोलिसासमोर मोठे आव्हान

नांदूरा: खून कोण व कोणत्या कारणासाठी करतो, हे खून करणाऱ्यालाचा माहिती असते. परंतु खून करुन मारेकरी फरार होतो, तेंव्हा त्याला पकडणे पोलिस प्रशासनासमोर एक मोठे आव्हान असते. अशीच एक घटना नांदूरा ते मोताळा रोडवरील माळेगाव जवळील माऊली पेट्रोलपंपाजवळ आज 3 मार्च रोजी उघडकीस आली. याप्रकरणी नांदूरा पोलिसांनी अज्ञात मारेकऱ्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

नांदूरा ते मोताळा रोडवरील माऊली पेट्रोलपंप माळेगांव शेतशिवारात नागरिकांना मृतदेह आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली होती. घटनेची माहिती मिळताच ठाणेदार विलास पाटील घटनास्थळी पोहचले. शेताच्या धुऱ्यावर अनोळखी 30 ते 35 वर्ष वयोगटातील युवकाचे प्रेत दिसून आले. युवकाच्या शरिरावर मारहाणीच्या जखमा आढळून आल्या असून त्याच्या डोक्यावर व चेहऱ्यावर मारहाणीच्या जखमा आढळून आल्या आहेत. जिल्हा पोलिस अधिक्षक, उपविभागीय पोलिस अधिकारी यांनी घटनास्थळी भेट देवून माहिती जाणून घेतली. युवकाचा रात्री अज्ञातांनी रात्री खून करुन त्याचा मृतदेह माळेगाव शिवारातील शेतात फेकल्याच्या अंदाजावरुन पोलिसांनी शेतमालकाच्या फिर्यादीवरुन नांदूरा पोलिसांनी अज्ञात मारेकऱ्यावर खूनाचा गुन्हा दाखल केला असून खुन्याला पकडणे पोलिस प्रशासनासमोर एक मोठे आव्हान आहे.