मोताळा- तालुक्यातील कुऱ्हा येथील एका 23 वर्षीय युवकाने निंबाच्या झाडाला गळफास घेवून आत्महत्या केली. सदर घटना शनिवार 21 डिसेंबरच्या दुपारी 3 वाजेच्या सुमारास उघडकीस आली. मृतक युवकाचे नाव गजानन तायडे असे आहे.
कुऱ्हा येथील शिवाजी ओंकार तायडे यांनी धा.बढे पोलिसात फिर्याद दिली की, त्यांचा चुलत भाऊ गजानन पांडूरंग तायडे (वय 23) हा 21 डिसेबरला दुपारी 2 वाजेच्या सुमारास शेतात गेला होता. 3 वाजेच्या सुमारास फिर्यादी शेतातून घरी आले असता, गावात चर्चा झाली, गजानन तायडे याने त्याचे शेतामध्ये निंबाच्या झाडाला गळफास घेवून आत्महत्या केली. शिवाजी तायडे यांनी शेतात जावून पाहिले असता, गजानन तायडे हा निंबाच्या झाडाला गळफास घेवून आत्महत्या केल्याचे दिसून आले. अशा फिर्यादीवरुन धा.बढे पोलिसांनी मर्ग दाखल केला आहे. युवकाने आत्महत्या का केली, याचे कारण मात्र समजू शकले नाही.