Wednesday, May 6, 2026
Home Buldana शिवसेना बांधकाम कामगार संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी मधुकर जोगदंड

शिवसेना बांधकाम कामगार संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी मधुकर जोगदंड

39

बुलढाणा-शिवसेना पक्षाच्या बांधकाम कामगार संघटना जिल्हाध्यक्षदी मधुकर जोगदंड यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली. सदर नियुक्ती शिवसेना सचिव संजय मोरे यांनी एका पत्रकान्वये केली आहे.

बांधकाम कामगारांच्या न्याय्य हक्कांसाठी मधुकर जोगदंड नेहमी अग्रेसर असून कामगारांच्या समस्या अधिकार्‍यांपर्यत पोहचवून त्यांना न्याय देतात. कामगारांच्या हक्कासाठी त्यांनी वेळोवेळी अधिकारी व लोकप्रतिनिधीकडे पाठपुरावा करीत त्यांच्या समस्यांना वाचा फोडली. मधुकर जोगदंड यांच्या कार्याची दखल घेत त्यांची शिवसेना पक्षाच्या बांधकाम कामगार संघटनेच्या (बुलढाणा, चिखली व विधानसभा) कार्यक्षेत्रात जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.सदर नियुक्ती शिवसेना पक्षाचे सचिव संजय पुष्पलता भाऊराव मोरे यांनी शिवसेना मुख्यनेते उपमुख्यमंत्री ना.एकनाथराव शिंदे यांच्या आदेशान्वये केली. तर जिल्हाध्यक्ष मधुकर जोगदंड यांनी बांधकाम कामगारांसाठी लढा देणारे बबन वासुदेव गादे यांची जिल्हाउपाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.मधुकर जोगदंड व बबन गादे यांची नियुक्ती झाल्याने बांधकाम कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Don`t copy text!