कारने स्कूल बसला उडविले; एक जागीच ठार

67

मोताळा-नांदूरा रोडवरील घटना

मोताळा- नांदुरा रोडवरील 132 केव्ही उपकेंद्रासमोर उभ्या असलेल्या स्कूलबसला भरधाव कारने जोरदार धडक दिली. या धडकेत 32 वर्षीय युवक ठार झाल्याची घटना 23 डिसेंबरच्या मध्यरात्री दीडवाजेच्या सुमारास घडली. मृतक हा जळगाव जामोद येथील असून त्याचे नाव मो.मुसब अब्दुल जाबीर असे आहे.

मोताळा येथून एम.एच.28 बी-8374 ही स्कूल बस कार्यक्रमाच्या लोकांना घेवून जळगाव जामोदकडे जात होती. गाडी गरम झाल्याने त्यामध्ये पाणी टाकण्यासाठी सदर गाडी मोताळा नांदुरा रोडवरील महावितरणचे 132 केव्ही उपकेंद्रासमोर उभी केली. दरम्यान, मो.मुसब अब्दुल जाबीर (वय 32) रा.राणी पार्क जळगाव जामोद हे खाली उतरून गाडीमध्ये पाणी टाकत असतांना नांदुराकडून येणाऱ्या भरधाव होंडा कार क्र.एम.एच.03 सीएम-1471 च्या चालकाने स्कूलबसला जोरदार धडक दिली. या धडकेत मो.मुसब अब्दुल जाबीर हे जागीच ठार झाले. सुदैवाने स्कूलबसमधील इतर प्रवाशांना दुखापत झाली नसल्याने पुढील अनर्थ टळला. लइक अहेमद अब्दुल खालीक देशमुख रा.जळगाव जामोद यांच्या फिर्यादीवरुन बोराखेडी पोलिसांनी कारचालक अखिलेश विजय चौधरी नांदुरा याच्यावर अपराध क्र. 619/2024 भारतीय न्याय संहिता कलम 106(1),281,125 (A) 125(B) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. स्कूलबसमध्ये किती प्रवाशी होते, याचा आकडा मात्र समजू शकला नाही. पुढील तपास पोलिस करीत आहे.