सोमनाथ सुर्यवंशीच्या न्यायासाठी संविधान प्रेमींचा तहसिल कार्यालयावर ‘आक्रोश’!

19

गृहमंत्री अमित शहांच्या वक्तव्याच्या नोंदविला निषेध !

मोताळा- केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याचा निषेध, संविधान विध्ववंस प्रकरणातील आरोपी व सोमनाथ सुर्यवंशी यांची हत्या करणाऱ्या दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, यासह आदी न्याय्य मागण्यांसाठी 24 डिसेंबर रोजी शाहू, फुले, आंबेडकर विधारधारा व संविधान प्रेमी यांच्यावतीने मोताळा तहसिल कार्यालयावर भव्य ‘आक्रोश’ मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात शेकडो महिला व समाजबांधव सहभागी झाले होते.

मंगळवार 24 डिसेंबर रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास आक्रोश मोर्चाला आठवडी बाजारातून सुरुवात करण्यात आली. मोर्चा शहरातील नांदुरा-मोताळा रोडवरुन मार्गक्रमण करीत दुपारी 2.30 वाजता तहसिल कार्यालयावर पोहचला. मोर्चाचे भव्य सभेत रुपांत रुपांतर होवून गृहमंत्री अमित शहा यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवून अमित शहा मुर्दाबादच्या घोषणा देवून निषेध नोंदविण्यात आला. या आक्रोश मोर्चात शेकडो महिला व समाजबांधव सहभागी झाले होते. येथे उपस्थित मान्यवरांनी समायोचित मार्गदर्शन केले. त्यानंतर शिष्टमंडळाच्यावतीने तहसिलदार यांच्यामार्फत महामहिम राष्ट्रपतींना
संविधान निर्माता डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान प्रकरणी अमित शहा यांचा गृहमंत्री पदाचा घेण्यात यावा.

अमित शहा व भाजपाने संविधान प्रेमी राष्ट्रप्रेमी व आंबेडकरवादी जनतेची जाहीर माफी मागावी, परभणी येथील संविधान शिल्प विध्ववंस प्रकरणी सोपान पवार याच्याविरुध्द देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, सोमनाथ सुर्यवंशी या सुशिक्षित तरुणास पोलिसांनी बेदम मारहान केल्यामुळे त्याचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला, मारहाण करणाऱ्या पोलिसांविरुध्द सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, सोमनाथ सुर्यवंशी हत्या पोलिसांकडून झाली आहे. त्याच्या कुटुंबीयाला 1 कोटी रुपये भरपाई देवून कुटुबातील एका व्यक्तीला शासकीय सेवेत सामावून घेण्यात यावे, बिड जिल्ह्यातील मसाजोगी गावातील सरपंच संतोषराव देशमुख व परभणीच्या सोमनाथ सुर्यवंशी यांच्या हत्याकांडाची एसआयटी मार्फत चौकशी करुन गुन्ह दाखल करण्यात यावे, सिसीटीव्ही फुटेज तपासून दगडफेक करणाऱ्या पोलिसांना सेवेतून निलंबीत करुन वाहनांची तोडफोड व इतर नुकसानीची भरपाई त्यांच्याकडून भरपाई करण्यात यावी. आंदोलनकर्त्या युवकावरील सर्व गुन्हे खारीज करण्यात यावे, वरील मागण्यांची दखल घेवून कारवाई करण्यात यावी, अन्यथा तालुक्यातील शाहू, फुले, आंबेडकर विधारधारेच्या लोकांकडून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला. निवेदन देतांना डी.टी.इंगळे, अरुणभाऊ डोंगरे, लक्ष्मणराव गवई, भीमराव सिरसाट, निलकंठ वानखेडे, साहेबराव डोंगरे, अ‍ॅड.जयश्रीताई शेळके, अ‍ॅड.गणेशसिंग राजपूत, अनिल खराटे, अ‍ॅड.सतिषचंद्र रोठे, संतोष मेढे, कैलास खराटे, संदीप मोरे, संदीप वानखेडे, विनोद धुरंधर, विनाद सावळे, अजय खराटे, जितेंद्र खराटे, संतोष खराटे, बाळासाहेब अहिरे, शे.साबू शे., एस.पी.अहिरे, विजय सुरळकर, सॅन्डी मेढे, मिलींद जैस्वाल, जसवंत सरदार, विनोद सरकटे यांच्यासह शेकडो बांधव उपस्थित होते.