लालमाती फाटा येथे मर्डर…! लोखंडी टॉमीने संपविला

11

धा.बढे: मोताळा तालुक्यातील वाघजाळ ते धा.बढे रोडवरील लालमाती फाट्यावर जुन्या वादातून एकाने दुसऱ्याचा लोखंडी टॉमीने मारहाण करुन खून केला. सदर घटना आज बुधवार 12 मार्चच्या सायंकाळी 6.30 वाजेच्या सुमारास उघडकीस आली. मृतक हा पान्हेरा(खेडी) येथील असून त्याचे नाव अनिल प्रल्हाद बावस्कर असे आहे. तर खून करणार प्रदीप गोविंदा कुळे हा सुध्दा पान्हेरा येथील असून खून केल्यानंतर तो धा.बढे पोलिस स्टेशनमध्ये हजर झाला.

पान्हेरा येथील रहिवासी अनिल बावस्कर व प्रदीप कुळे यांच्यामध्ये पूर्वी काही वाद असल्याची माहिती समोर आली असून त्या वादातून प्रदीप उर्फ पिंटू कुळे (वय 42) याने आज बुधवार 12 मार्च रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास लालमाती फाटा येथील पेट्रोल पंपासमोर अनिल बावस्कर (वय 47) यांना लोखंडी टॉमीने बेदम मारहाण केली. या मारहाणीत अनिल बावस्कर मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. यावेळी घाबरलेल्या अवस्थेत प्रदीप कुळे हा धा.बढे पोलिसांत जावून गुन्ह्याची कबुली दिली.घटनेची माहिती मिळताच ठाणेदार नागेश जायले यांच्यासह कर्मचारी घटनास्थळी दाखल होवून घटनेचा पंचनामा केला. धा.बढे पोस्टे.गुन्हा नोंदविण्याची प्रक्रीया सुरु होती.