Monday, April 20, 2026
Home Buldana 16 एप्रिलला मलकापूर तालुक्यातील सरपंच पदाचे आरक्षण

16 एप्रिलला मलकापूर तालुक्यातील सरपंच पदाचे आरक्षण

79

बुलडाणा (शासकीय वार्ता) : ग्रामविकास व जलसंधारण विभागाच्या अधिसूचनेनुसार मलकापूर तालुक्यातील 49 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांची आरक्षण निश्चित करायचे आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाचे कलम 30 अन्वये तसेच मुंबई ग्रामपंचायत (सरपंच व उपसरपंच) निवडणूक नियम 1964 मधील तरतुदीनुसार सन 2025 ते 2030 दरम्यान मलकापूर तालुक्यातील सार्वत्रिक निवडणूकीद्वारे गठीत होणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदांचे आरक्षण बुधवार 16 एप्रिल रोजी प्रशासकीय इमारत, तहसिल कार्यालय, मलकापूर येथे सोडत काढण्यासाठी सभा आयोजीत करण्यात आली आहे.

तसेच अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग व खुल्या प्रवर्गा अंतर्गत महिलांकरीता आरक्षण सोडत शुक्रवार 25 एप्रिल रोजी सकाळी ठिक 11 वाजता जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, बुलडाणा येथे सूरु होणार असून उपविभाग मलकापुर अंतर्गत मलकापूर तालुक्याचे महिलांकरीता आरक्षण सोडत दुपारी 2वाजता निश्चीत करण्यात येणार आहे. सदर आरक्षण सोडतीकरीता मलकापूर तालुक्यातील सर्व लोकप्रतिनिधी, राजकीय पक्षांचे पदाधिकारी व नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन मलकापूर तहसीलदार आर.एम.तायडे यांनी कळविले आहे.

Don`t copy text!