मोताळा तालुक्यातील लपाली येथील घटना; पत्नीसह चौघांवर गुन्हा दाखल
धा.बढे- पत्नीला घेण्यासासाठी गेलेले युवकासोबत सासु-सासरे, पत्नी व साल्याने वाद केला. या वादातून युवकाने आत्महत्या केल्याची घटना मोताळा तालुक्यातील लपाली येथे घडली. याप्रकरणी धा.बढे पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पत्नीसह चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. मृतक हा जळगाव खांदेश जिल्ह्यातील असून त्याचे नाव बादल हवसु मंडाळे असे आहे.
जळगाव खांदेश जिल्ह्यातील कुभांरी ता.जामनेर येथील इंदुबाई चिंधु मुके यांनी धामणगाव बढे पोलिसात फिर्याद दिली की, त्यांचा भाचा बादल हवसु मंडाळे हा सोमवार 8 सप्टेंबर रोजी त्याची पत्नी रुपाली बादल मंडाळे हीच्या पोटातील बाळ पाडले, असे माहीती मिळाल्याने पत्नीला सोबत घेवून येतो, असे सांगून मोताळा तालुक्यातील लपाली येथे गेला होता. दरम्यान, दुपारी तीन वाजेच्या सुमारास फिर्यादीला तिचा पुतण्या श्रीराम जोशी याने माहिती दिली की, बादल हवसु मंडाळे हा विषारी औषध घेवून लपाली येथे मरण पावला. माहिती मिळताच फिर्यादी श्रीराम जोशी व इतर असे खाजगी गाडी करुन लपाली येथे गेले असता लपाली येथील बंडू होसा एकणार याचे घरी बादल मंडाळे हा मरण पावलेला दिसला. यावेळी गावात विचारपूस केली असता लपाली येथील गोपाल दगडू मुंडाळे याने सांगीतले की बादल मुंडाळे व त्यांची पत्नी सासु- सासरे व साल्यासोबत वाद झाल्याने बादलने त्यांच्या त्रासाला कंटाळून विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या केल्याच्या इंदुबाई मुके यांच्या फिर्यादीवरुन धा.बढे पोलिसांनी बादलची पत्नी रुपाली बादल मंडाळे, सासरे संजय जयराम भंवर, सासू लिलाबाई संजय भंवर व साला अक्षय संजय भंवर याच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी भारतीय न्याय संहिता 2023 कलम 108,3 (5) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार नागेश जायले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक राहुल वरारकर हे करीत आहे.