जिल्हा पोलिस दलाने आठशे किलो गांजा केला नष्ट!

13

‘मिशन परिवर्तन’ अंतर्गत 11 गुन्ह्यात पकडण्यात आला होता करोडो रुपयांचा गांजा

बुलढाणा: जिल्हा पोलिस अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारताच निलेश तांबे यांनी आपल्या कल्पनेतून विविध असे उपक्रम राबवित आहे. गुन्ह्यांचे प्रमाण कमी करुन गुन्हेगारांवर वचक निर्माण केला आहे. निलेश तांबे यांच्या संकल्पनेतेून 26 जून 2025 पासून जिल्ह्यात अंमली पदार्थ विरोधी ‘मिशन परिवर्तन’ अभियान सुरु करीत जिल्ह्यात पकडण्यात आलेला करोडो रुपयांचा 800 किलो 446 ग्रॅम गांजा नष्ट करण्यात आला.

जिल्ह्यात सुरु करण्यात आलेल्या अंमली पदार्थ विरोधी अभियान ‘मिशन परीवर्तन’ अंतर्गत 16 जून ते 30 सप्टेंबर दरम्यान विविध 11 कार्यवाहीत साडेआठशे किलो गांजा पोलिस महासंचालक मुंबई यांच्या आदेशान्वये पोलिस महानिरीक्षक अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली पकडण्यात आला होता. पोलिस अधीक्षक निलेश तांबे यांचे मार्गदर्शनाखाली केंद्रीय गोडावूनमध्ये संकलीत असलेल्या गांजाची कायदेशीर निकष लावित सर्वोच्च न्यायलयाच्या मार्गदर्शन सुचनेन्वये महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची परवानगी घेवून त्यांनी प्राधिकृत केलेल्या Maharashtra Enviro Power Limited Butibori Dist.Nagpur’ या ठिकाणी जिल्हास्तरीय ड्रग्ज डिस्पोजल समिती सदस्य अपर पोलीस अधीक्षक तथा सदस्य जिल्हास्तरीय ड्रग्ज डिस्पोजल समिती अमोल गायकवाड, पोलीस उपअधीक्षक (गृह) तथा समिती सदस्य पोलिस निरिक्षक बाळकृष्ण पावरा, स्थागुशाचे सुनिल अंबुलकर व नागपूर युनिटचे प्रशांत म्हस्के, दोन शासकिय पंच यांचे उपस्थितीत जिल्ह्यातील 11 गुन्ह्यांमध्ये हस्तगत करण्यात आलेला 800 किलो 646 ग्रॅम चा मुद्देमाल नष्ट करण्यात आला.

  • यांनी केली कारवाई
    सदर कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलिस अधीक्षक अमोल
    गायकवाड, स्थानिक गुन्हा शाखा पोलिस निरीक्षक सुनिल अंबुलकर , पोलिस निरीक्षक बाळकृष्ण पावरा
    प्रभार- पोउपअधि.(गृह), पोना.अरविंद बडगे, पोकाँ..जयंत बोचे, अमोल शेजोळ यांच्यासह आदींनी प्रदुषण मंडळाचे नियम पाळून केली.