बुलढाणा(शासकीय वार्ता) चिखली येथील अनोळखी इसमाला बुधवार 15 ऑक्टोबर रोजी जिल्हा सामान्य रुग्णालय, बुलढाणा येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. सदर मृत इसमास ओळखणाऱ्यांनी संपर्क साधाण्याचे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.
अनोळखी मृतकाचा रंग गोरा, उंची 5.4 इंच, अंगामध्ये निळसर रंगाचे जॉकेट, निळसर रंगाचे शर्ट, काळया रंगाची पॅन्ट, गळ्यामध्ये माळ व उजव्या मनगटावर गोंधलेले दिसत आहे. या वर्णनाचा इसमाचा कोणी नातेवाईक किंवा मित्रमंडळी ओळखत असल्यास बुलढाणा शहर पोलिस स्टेशन किंवा पोहेकाँ.नरेंद्र रोटे मो. 9623243733, विश्वास हिवाळे मो.8308578741 क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.