चांडोळ येथे युवकाची गळफास घेवून आत्महत्या

8

बुलढाणा- तालुक्यातील चांडोळ येथे एका 25 वर्षीय युवकाने मुस्लीम समाजाच्या कब्रस्तानमध्ये गळफास घेवून आत्महत्या केली. सदर घटना आज गुरुवार 16 ऑक्टोबर रोजी सकाळी उघडकीस आली. मृतकाचे नाव गजानन काळूराम खरात असे आहे.

चांडोळ येथील कब्रस्तानमध्ये गरीब नवाज दर्गाचे जवळ असलेल्या गुलमोहराचे झाडाला 16 ऑक्टोबर रोजी सकाळी 7 वाजेच्या सुमारास गजानन खरात (वय 25) याने गळफास घेवून आत्महत्या केली. सदर घटनेची माहिती गजु रेकनोत मृतकाच भाऊ सचिन खरात याला दिली. सचिनने कब्रस्तानमध्ये जावून पाहिले असता त्यांना गजानन खरात हा गुलमोहराच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत लटकलेल्या आढळून आला. सचिन खरात यांच्या फिर्यादीवरुन धाड पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. मृतकाला दारुचे व्यसन असल्याची माहिती समोर आली आहे. पुढील तपास धाड पोलिस करीत आहे.