एलसीबीने गांजाची वाहतूक करतांना तरोड्याच्या इसमाला पकडले; गांजासह 57 हजाराचा मुद्देमाल जप्त !

22

बुलढाणा ग्रामीण पोस्टे.हद्दीतील गोंधनखेड शिवारात कारवाई

बुलढाणा- स्थानिक गुन्हा शाखा पथकाने मोताळा तालुक्यातील तरोडा येथील गणेश मेरसिंग साबळे याला बुलढाणा ग्रामीण पोलिस स्टेशन हद्दीतील गोंधनखेड शिवारात 23 नोव्हेंबर पकडले. त्याच्या ताब्यातून 41 हजाराचा गांजा, 1 हजाराचा मोबाईल व 15 हजाराची दुचाकी असा 57 हजाराचा मुद्देमाल जप्त केला.

बुलढाणा स्थानिक गुन्हा शाखा पथक बुलढाणा उपविभागात रविवारी २३ नोव्हेंबर रोजी पेट्रोलिंग करीत होते. दरम्यान त्यांना जय हॉटेल गोंधनखेड शिवार बुलढाणा ग्रामीण पोलिस स्टेशन हद्दीत तरोडा ता.मोताळा येथील गणेश मेरसिंग साबळे (वय ४२) हा संशयास्पद फिरतांना दिसला. त्याच्या बजाज कंपनीची दुचाकी क्र. एम. एच.२८ अ‍ेके-१८९१ मोटार सायकलचे हॅन्डलला नायलॉन थैली लटकविलेली होती. स्थागुशा पथकाने त्याची विचारपूस करुन झडती घेतली असता त्याच्या नायलॉन थैलीत हिरवट, काळसर, कळीदार बिजा असलेला गांजा वजन २ किलो ५० ग्रॅम प्रति किलो किंमत २० हजार असा ४१ हजाराचा गांजा तसेच जीओ कंपनीचा मोबाईल किंमत १ हजार व जुनी दुचाकी किंमत १५ हजार रुपये असा एकूण ५७ हजाराचा मुद्देमाल केला. गणेश साबळे व इतर एक अशा दोघांवर बुलढाणा ग्रामीण पोस्टे.ला एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

  • यांच्या पथकाने केली कारवाई
    सदर कारवाई पोलिस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड, बुलढाणा स्थानिक गुन्हा शाखेचे पोलिस निरिक्षक सुनिल अंबुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थागुशाचे पोउपनी. अविनाश जायभाये, पोहेकाँ. दिपक लेकुरवाळे, विजय पै’णे, पोना. सुनिल मिसाळ, अनंत फरताळे, पोकाँ.गजानन गोरले, अमोल वानरे, चापोका निवृत्ती पुंड, रवि भिसे यांनी केली.