मोताळा- वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी लाकडांची अवैध वाहतूक करतांना रोहिणखेड बिटमधील खांडवा-बाम्हंदा रोडवर 25 हजाराच्या लाकडांसह 4 लाख 50 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर कारवाई 5 डिसेंबर रोजी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास करण्यात आल्याने अवैध लाकूड वाहतूक करणाऱ्या माफियांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
मोताळा वनपरिक्षेत्र हद्दीत मोठ्या प्रमाणात अवैध लाकडांची वाहतूक होत होती. त्या लाकूड चोरांना पकडण्याचे मोताळा वनविभागापुढे एक मोठे आव्हान होते. शुक्रवार 5 डिसेंबरच्या सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी रोहिणखेड बिटमधील खांडवा ते बाम्हंदा रोडवर अवैध लाकडांची ट्रकमधून वाहतूक होत असल्याच्या माहितीवरुन विना परवाना जळतन लाकडे वाहतूक करीत असताना ट्रक MH-43. U-3794 ला पकडले. यावेळी अतिरिक्त कार्यभार हनवतखेड वनरक्षक के .एन .तराळ, रोहिणखेड बिटचे वनपाल पी.एम.नारखडे यांनी ट्रकला ताब्यात घेवून पंचनामा करीत 4 लाख 50 हजाराचा ट्रक तसेच 25 हजाराचे मोहा, निम, बेहड्याचे लाकडे ताब्यात घेतले. याप्रकरणी ट्रक चालकावर वनगुन्हा कायद्यान्वे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



























