मोताळा- बुलढाणा राजूर घाटात आज सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास अॅपे व दुचाकीचा भिषण अपघात झाला. या अपघातामध्ये दुचाकीस्वार जागीच ठार झाला तर अॅपेमधील चौघे जखमी झाले. त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालय, बुलढाणा येथे दाखल करण्यात आले.
बुलढाणा येथून प्रवाशी घेवून अॅपे मोताळाकडे येत होते. दरम्यान राजूर घाटातील बालाजी मंदिराजवळ अॅपे व दुचाकीचा भिषण अपघात झाला. अपघात एवढा भिषण होता की, या अपघातामध्ये दुचाकीस्वार जागीच ठार झाला. दुचाकीस्वार अमरावती जिल्ह्यातील असून त्यांचे नाव वैभव वाट असे आहे. तर जखमी गजानन जवरे, रेखा जवरे रा.अंत्री, कविता पुरुषोत्तम गायगोळ, श्रावणी गायगोळ (वय 12) व सोहम नामदेव काकर रा.राजूर हे जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
- 108 पायलटची कर्तव्यदक्षता
डॉ.जखरीया देशमुख व पायलट अंकुश वाघ हे बुलढाण्यावरुन रुग्णवाहिका घेवून मोताळाकडे येते होते. दरम्यान त्यांना सायंकाळी 7.20 वाजेच्या सुमारास घाटामध्ये गर्दी दिसली. त्यांनी कर्तव्यदक्षता दाखवित जखमींना क्षणाचाही विलंब न लावता जिल्हा रुग्णालय बुलढाणा येथे उपचारार्थ दाखल केले.



























