मोताळा: शेतात धान्य पिकविण्यासाठी शेतकरी अहोरात्र मेहनत करतात. मात्र, त्याच अन्नाची नासधूस होवून ते फेकल्या जाते.. तेही नालीत यामुळे ते अन्न सडून रोगराई वाढण्याची शक्यता निर्माण झाल्याने मोताळा तालुक्यातील तरोडा ग्रामपंचायत प्रशासन आक्रमक मोडवर येत ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी Action मोडवर येत दवंडी देवून अन्न नालीत टाकणाऱ्यांवर कारवाई करण्याचा आक्रमक पवित्रा घेतला आहे.
‘अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे’ अन्न केवळ पोट भरण्याचे साधन नाही. ते जीवन, उर्जा आणि सृष्टीचा आधार आहे. अन्नाचा आदर करावा, ते वाया घालू नये..पाहिजे तेवढेच घ्यावे योग्य प्रमाणात सेवन करावे, असे भारतीय संस्कृतीत सांगितलेले आहे. शेतात अन्न पिकविण्यासाठी शेतकरी अहोरात्र कष्ट करतात. मात्र, तरोडा गावात नाल्यांमध्ये कचरा आणि शिजविलेले अन्न टाकल्या जात असल्यामुळे रोगराई वाढण्याची शक्यता पाहता ग्रामपंचायत प्रशासन अधिकाऱ्यांनी आज बुधवार 24 डिसेंबर रोजी दवंडीचे एक पत्रक जारी करीत शिजविलेले अन्न नालीमध्ये टाकू नये. जे नागरिक अन्न नालीमध्ये टाकतात.. त्यामुळे रोगराई पसरल्यास अन्न टाकणाऱ्यांवर कार्यवाही करण्याचे संकेत त्यांन दिले आहे. हा स्वच्छतेचा एक स्तुत्य निर्णय असून या निर्णयाचे तालुक्यात कौतूक होत आहे.
तरोडा ग्रामपंचायतचा स्तुत्य निर्णय..
अन्न नालीत टाकल्यामुळे सदर अन्न सडून घाण वास येतो. त्यावर डास उत्पती होवून रोगराई वाढण्याची शक्यता निर्माण होते. रोगगाई टाळण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने घेतलेला निर्णय योग्य असून असाच निर्णय तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतींनी घेतल्यास गावातील घाण व रोगराई कमी होण्यास मदत होईल, अशी प्रतिक्रीया सुज्ञ नागरिक व्यक्त करीत आहे.



























