Friday, April 3, 2026
Home Buldana मोताळ्याचा आठवडी बाजार शुक्रवारी भरणार !

मोताळ्याचा आठवडी बाजार शुक्रवारी भरणार !

36

मोताळा(गणेश वाघ) -मोताळा हे तालुक्याचे ठिकाण असून त्याला लागून 60 ते 70 खेडे आहेत. येथे गुरुवारी मोठा आठवडी बाजार व ढोरबाजार भरतो. परंतु यावेळी गुरुवार 26 मार्च रोजी श्रीरामनवी उत्सव असल्याने गुरुवारचा आठवडी बाजार रद्द करण्यात आला. आता बाजार शुक्रवार 27 मार्च रोजी भरणार आहे..याची व्यावसायिक, नागरिकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन मोताळा नगर पंचायत प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

मोताळा येथे दर गुरुवारी मोठा आठवडी बाजार भरतो. बाजारामध्ये हजारोच्या संख्येने नागरिक बाजारासाठी येतात. तसेच नांदुरा, मलकापूर, बुलढाणा शहरातील व्यावसायीक व शेतकरी आपले भाजीपाल्याचे दुकाने थाटतात. गुरुवार 26 मार्च रोजी आठवडी बाजार आला आहे. त्याच दिवशी श्रीराम नववी उत्सव निमित्त मिरवणूक काढण्यात येणार असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू शकतो, करीता आठवडी बाजार संदर्भात बोराखेडी पोलिस स्टेशन पोलिस निरिक्षक यांचे पत्र मोताळा नगर पंचायत प्रशासनाला प्राप्त झाले असून त्यांनी आठवडी बाजाराचा दिवस बदलून मागितल्याने गुरुवारचा आठवडी बाजार शुक्रवार 27 मार्च रोजी भरणार आहे, याची नागरिक व आठवडी बाजारात दुकाने थाटणाऱ्या व्यावसायिकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन मोताळा नगर पंचायत मुख्याधिकारी गणेश पांडे यांनी केले आहे.

Don`t copy text!