Wednesday, May 13, 2026
Home Buldana नाभिक समाजाच्या प्रश्नावर आ.सिध्दार्थ खरातांनी विधिमंडळात उठविला आवाज

नाभिक समाजाच्या प्रश्नावर आ.सिध्दार्थ खरातांनी विधिमंडळात उठविला आवाज

30

बुलढाणा- (गणेश वाघ )संत श्रेष्ठ सेना महाराज हे विठ्ठल भक्त वारकरी संप्रदायाचे आदरणीय स्थान आहे. हिंदवी स्वराज्याची स्थापना करताना ज्यांनी रयतेसाठी प्राणाची आहूती दिली, असे नरवीर शिवाजी काशीद, नरवीर जिवाजी महाले या लढवय्या मावळ्यांच्या निष्ठेला जपणारा हा नाभिक समाज आहे. या समाजाला सार्वजनिक ठिकाणी ‘हजाम’ किंवा ‘वारिक’ या नावाने संबोधल्या जाते. नाभिक समाजाला ‘नाभिक’ नावाने संबोधने यासह समाजबांधवाच्या न्याय्य मागण्यासंदर्भात विधिमंडळात आ.सिध्दार्थ खरातांनी आवाज उठविल्याबद्दल त्यांचे समाजाच्यावतीने आभार व्यक्त करण्यात आले.

महाराष्ट्र मध्ये नाभिक समाजांना नाभिक या नावाने संबोधणे आवश्यक आहे. मात्र, समाजबांधवांना ‘हजाम’ व ‘वारिक’ संबोधल्या जाते. याबाबत विधीमंडळात आ.सिध्दार्थ खरात यांनी आवाज उठवित सदर प्रथा कायद्याने कर्नाटक सरकार प्रमाणे रद्द करावी आणि कायदा करून त्यांना ‘नाभिक’ म्हणून संबोधण्यात यावे तसेच सरकारने यावर तात्काळ कारवाई करावी. हिंदवी स्वराज्याची स्थापना करताना प्राणाची बलिदान देणारे वीर जिवाजी महाले व वीर शिवाजी काशीद या महापुरुषांच्या जयंतीनिमित्त सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी, यासह आदी न्याय्य संदर्भात विधिमंडळात आ.सिध्दार्थ खरात यांनी आवाज उठविल्याबद्दल नाभिक समाजाच्यावतीने विजय गवळी, समाजभूषण दामोधर बिडवे, दत्ताजी मोतेकर, माधवजी ससाणे, शिवदासजी ढोलेकर, रविंद्र सूर्यवंशी, मंगेश बिडवे, रमेश वखरे, राजूभाऊ पांडे व समस्त नाभिक समाज बांधव यांनी आमदार सिध्दार्थ खरात यांचे आभार व्यक्त केले.

Don`t copy text!