Thursday, April 2, 2026
Home Breaking News जिल्हा प्रशासनाने पेट्रोल व डिझेलची टंचाई दूर करुन जनतेला वास्तविकता सांगावी; वंचितचे...

जिल्हा प्रशासनाने पेट्रोल व डिझेलची टंचाई दूर करुन जनतेला वास्तविकता सांगावी; वंचितचे जिल्हाध्यक्ष निलेश जाधव यांचे आवाहन

13

बुलडाणा- ईरान व अमेरिका यांच्या युद्धामध्ये जगासह आपल्या संपूर्ण देशाला सुद्धा या युद्धाचे परिणाम भोगावे लागत आहे.पेट्रोल व डिझेल हा सर्व जनतेचा दैनंदिन जीवनातील एक महत्त्वाचा भाग आहे. पेट्रोल व डिझल चा तुटवडा नाही असे आपल्या जिल्ह्या प्रशासन हे वारंवार आवाहन करुन जनतेची एकप्रकारे जनतेची फसवून करत तर नाही ना? असा प्रश्न नागरिक म्हणून पडला असून 26 मार्च रोजी जिल्ह्यातील पेट्रोल पंपांची माहिती घेतली असता जिल्ह्यातील 50 टक्के पेट्रोल पंप बंद होते. तिथे पेट्रोल वा डिझेल नव्हते,असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष निलेश जाधव यांनी करीत जिल्हा प्रशासनाने पेट्रोल व डिझेलची टंचाई दूर करुन जनतेला वास्तविकता सांगावी, असे आवाहन देखील जाधव यांनी केले आहे.

निलेश जाधव यांनी प्रसार माध्यमांना प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले की, जर जिल्ह्यात पेट्रोल व डिझेलचा तुटवडा नाही तर जिल्ह्यातील पेट्रोल पंप बंद का? व असे आवाहन करुन एकप्रकारे जनतेला पेट्रोल व डिझेलचा तुटोवडा आहेच हे आपल्या सांगण्यामागचा हेतू तर नाही ना असा प्रश्न त्यांनी उपस्थिती करीत जिल्हा प्रशासनास आवाहन जिल्ह्यातील जनतेला सत्यता सांगता सांगावी जेणेकरुनजनतेचा उद्रेक होणार नाही, तसेच आपण या बाबत आवश्यक कार्यवाही करून पेट्रोल व डिझेलची उपलब्धता सुनिश्चित करण्याचे आवाहन देखील निलेश जाधव यांनी जिल्हा प्रशासनास केले आहे.

तेढ निर्माण होणारी रिल टाकू नये
निलेश जाधव यांनी म्हटले की, काही सनातनी हिंदू म्हणून सोशल मीडियावर रील वा आवाहन करीत मुस्लीम बांधवांकडून कुढल्याही जीवनावश्यक वस्तुची खरेदी करु नये, असे सांगतात. भारतात येणारे पेट्रोल, डिझेल व ड्रायफुड हे मुस्लिम देशातुनच आपल्या देशात येत असल्याने वाद निर्माण होईल,अशा रील सोशल मीडियावरुन टाकणे बंद करण्याचे आवाहन देखील वंचितचे जिल्हाध्यक्ष निलेश जाधव यांनी केले आहे.
(सदर मत हे वंचित जिल्हाध्यक्ष निलेश जाधव यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात व्यक्त केले आहे.)

Don`t copy text!