मोताळा: महिलेला मारहाण करण्यात कोणता पुरुषार्थ आहे? पण हे काम केले, मलकापूर तालुक्यातील निमखेड येथील एका पुरुषाने. महिलेने धुण्याचे पाणी का अडविले? असे विचारल्याने त्याने चक्क महिलेला चापटाबुक्क्यांनी मारहाण करीत डोक्यात वीट मारली. सदर घटना 29 मार्च रोजी दुपारच्या सुमारास घडली.
पोलिस विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार झाले असे की, निमखेड येथे रविवार 29 मार्च रोजी 29 वर्षीय सौ.शितल शंकर दोडे ही महिला दुपारच्या सुमारास तिच्या घरासमोर धुणे धुत होती. धुण्याचे पाणी रस्त्यावरुन नाल्यात जात असतांना ते दिनकर दोडे यांनी वळण टाकून अडविल्याने शितल दोडे त्यांना विचारण्यास गेल्या असता दिनकर रामचंद्र दोडे यांनी शिविगाळ करीत चापटाबुक्क्यांनी मारहाण करीत डोक्यात विट मारली, अशा शितल दोडे यांच्या फिर्यादीवरुन बोराखेडी पोलिसांनी दिनकर दोडे यांच्यावर भारतीय न्याय संहिता 2023 कलम 118(1), 115(2), 352 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोहेकाँ.विजय सुरळकर हे करीत आहे.


























