मोताळा- तळणी ग्रामपंचायतीने ‘आर. आर. आबा पाटील सुंदर गाव’ योजनेतील उल्लेखनीय कामगिरी व ग्रामस्थांनी लोकसहभागातून प्लास्टिक मुक्तीसाठी आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठी एक पाऊल पुढे टाकत, लोकसहभागातून पंगतीसाठी स्टीलची ताटे उपलब्ध करून दिल्याबद्दल आ.संजय गायकवाड यांच्याहस्ते तळणी ग्रामपंचायतचा सन्मान करण्यात आला.
मोताळा पंचायत समितीची सन २०२५-२६ ची वार्षिक आमसभा आणि सरपंच मेळावा नुकताच मोताळा येथे आ. संजय गायकवाड यांच्या अध्यक्षेतखाली आणि गट विकास अधिकारी अशोक काळे यांच्या उपस्थितीत पार पडला. त्यावेळी तळणी ग्रामपंचायतीने ‘आर. आर. आबा पाटील सुंदर गाव’ योजनेत केलेली उल्लेखनीय कामगिरी तसेच तळणी ग्रामस्थांनी लोकसहभागातून प्लास्टिक मुक्तीसाठी आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठी एक पाऊल पुढे टाकत, लोकसहभागातून पंगतीसाठी स्टीलची ताटे उपलब्ध करून दिल्याबद्दल तळणीच्या आ.संजय गायकवाड यांच्याहस्ते सरपंच सौ. वत्सलाबाई बोदडे , ग्रामसेवक एस. एम. राऊत यांचा सत्कार करण्यात आला.



























