परमपिता एक ज्योर्तीलींग स्वरुप आहे-गिता दिदी

145

BNU न्यूज नेटवर्क..
मोताळा (20 FEB.2023) भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. जाती, धर्म, भाषा वेगवेगळे आहेत. परंतु ईश्वर परमपिता एकच असून तो ज्योतीबिंदू स्वरुप आले. ईवर आपल्याकडून सर्व कामे करुन घेतो, आपण फक्त कारण निमित्त असून करता करवित तोच आहे. महाशिवरात्री का साजरी केली जाते याबाबत बोलतांना गिता दिदींनी ईश्वरांना काटेरी पुष्प वाहण्याआधी आपल्यातील कृविचारांना, दृष्कृत्यांना शिवअर्पण केल्यास अंधकार व पापापासून दूर होवू शकतो, असे मार्गदर्शन ब्रम्हाकुमारी गिता दिली यांनी केले.

प्रजापिता ब्रम्हाकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय मोताळा येथे आज 19 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री महोत्सवानिमित्त प्रजापिता ब्रम्हाकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय संचालिका ब्रम्हाकुमारी गिता दिदी यांच्या हस्ते सकाळी ९.३० शिव ध्वजारोहण करण्यात आले, त्यावेळी त्या बोलत होत्या. पुढे बोलतांना गिता दिदी यांनी शिवरात्रीचा शाब्दीक अर्थ विषद करीत त्यांनी पुण्य आत्म्यांची आपण जयंती साजरी करतो परंतु, महाशिवरात्रीच का म्हटले जाते कारण परमपिता परमात्मा हे जन्मृ-मृत्यू पासून अलग वेगळे असल्याने त्यांचे अवतरण होत असल्याने महाशिवरात्री साजरी केली जाते, मार्गदर्शन गिता दिदी यांनी आपल्या प्रवचनातून केले. या कार्यक्रमास मलकापूर येथील व्यापारी नानकरामजी परयानी, सोनीया परयाणी तसेच आदी मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी मलकापूर येथील गोल्डन पॅराडाईज ग्रुपच्या मुलांनी परमपिता एकच आहे, याबाबत नाटीकेमधून सादरीकरण केले. शिवभोजनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. संचालन ब्रम्हाकुमारी दिपा दिदी यांनी तर मोताळा विश्वविद्यालयाच्या पुष्पा दिदी यांनी केले.