BNUन्यूज नेटवर्क..
बुलढाणा (20 FEB.2023) निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण निवडणूक चिन्ह शिंदे गटाला दिल्याच्या निषेधार्थ आज सोमवार 20 फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने जोरदार निदर्शने करण्यात आली. केंद्रातील भाजप सरकार सत्तेच्या जोरावर लोकशाही संपवण्याच्या मार्गावर असल्याच्या घणाघाती आरोप यावेळी लखन गाडेकर यांनी केला आहे.. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करुन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, केंद्रातील मोदी सरकारच्या दबावाखालीच निवडणूक आयोगाने हा निर्णय दिल्याचे आंदोलनकर्त्या शिवसैनिकांचे म्हणणे आहे. जोपर्यंत सुप्रीम कोर्टाचा निकाल येत नाही, तोपर्यंत निर्णय देण्याची घाई कशामुळे झाली हे वेगळे सांगण्याची गरज नाही, असेही सूचक विधान यावेळी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केले आहे. ही राज्यघटनेची पायमल्ली असल्याचे बुलढाणा तालुकाप्रमुख लखन गाडेकर म्हणाले. निवडणूक आयोगाच्या या अविवेकी निर्णयाच्या विरोधात यावेळी प्रचंड घोषणाबाजी शिवसैनिकांनी केली.. या घोषणाबाजीने संपूर्ण जिल्हाधिकारी परिसर दणाणून गेला होता..
यांनी केले आंदोलन…
सभा संघटक अशोक इंगळे ,शिवसेना तालुकाप्रमुख अमोल शिंदे, अमोल बुधवत,हेमंत खेडेकर,प्रकाश डोंगरे, बबन खरे,गणेश सूनुने,जगदीश मनवतकर,एकनाथ कोरडे,सचिन परांडे, शेख आखिल,मोहन निमरुट, दीपक पिंपळे,सदाशिव बुधवत, विजय इतवारे,योगेश पालकर, सुनील गवते,सुधाकर आघाव, डॉ मधसुदन साळवे,गणेश पालकर,राहुल शेलार,किरण दराडे,दादाराव रिंढे,गोकुळशिंग जगताप, प्रफुल जायभाये, यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
शिवसेना चोरीला गेल्याची फिर्याद..
शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे बुलढाणा तालुका अध्यक्ष लखन गाडेकर यांनी आज 20 फेब्रुवारी रोजी निवडणूक आयोगाचा निषेध नोंदवित शिवसेना नाव व धनुष्यबाण चोरीला गेल्याची बुलढाणा शहर पोस्टे.ला फिर्याद दिली असून त्यांनी, फिर्यादीत म्हटले आहे की, धनुष्यबाण ही सर्व निष्ठावन शिवसैनिकांची अस्मीता असून हिंदुहदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना उभी केली असून यामध्ये अनेक हुतात्मांनी शिवसेना जपण्याचे काम केले होते. भाजपाने निवडणूक आयोगाला हाताशी धरुन धनुष्यबाण चिन्ह व शिवसेना चोरले असून त्याचा तपास करुन धनुष्यबाण चिन्ह व नाव परत देण्यात यावे, अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन छेडण्याचा इशारा सुध्दा तालुका शिवसेनेच्यावती निवेदनात दिला आहे.