शेतकऱ्याचे दीड लाखाचे नुकसान; परिसरात भितीचे वातावरण!!
मोताळा- मोताळा वनपरिक्षेत्र अंतर्गत असलेल्या रोहिणखेड-उबाळखेड शिवारात बिबट्याच्या हल्ल्यामुळे शेतकऱ्यामध्ये भितीची वातावरण आहे. त्यातच ५ जानेवारी रोजी तालुक्यातील किन्होळा येथील शेतकऱ्याच्या वाड्यात बांधलेल्या 10 बकऱ्या बिबट्याने फस्त केल्याने त्यांचे दीड लाखाचे नुकसान झाले आहे. तशी तक्रार भास्कर पंढरी गवई यांनी मोताळा वनअधिकारी यांच्याकडे केली आहे.
मोताळा तालुक्यातील किन्होळा येथील शेतकरी भास्कर पंढरी गवई यांची पोखरी शिवारात शेती आहे. त्यांनी आपल्या शेळ्या वाड्यामध्ये बांधल्या होत्या. रविवार ५ जानेवारी रोजी सकाळी अचानक बिबट्याने बकऱ्यांवर हल्ला चढवित शेळ्यांना जखमी केले. त्यातील काही शेळ्या ठार झाल्या. यामुळे भास्कर गवई यांचे दीड लाखाचे नुकसान झाले आहे. बिबट्याच्या हल्ल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. घटनेची माहिती मोताळा वनपरिक्षेत्र अधिकारी यांना देण्यात आली. वनकर्मचारी घटनास्थळी पोहचून पंचनामा करुन तक्रार ऑनलाईन करण्यात आली. गवई यांनी वनविभागाकडे नुकसान भरपाई देण्याची मागणी करीत हिंस्त्र वन्यप्राणी बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.