मलकापूर: चोरटे कुठे व केंव्हा चोरी करतील याचा नेम राहिलेला नाही. असाच एक प्रकार मलकापूर शहरातील चैतन्यवाडी परिसरात घडला. चोरट्यांनी आपले नेटवर्क सक्रीय करीत एका नोकरीवाल्याच्या घराकडे आपला मोर्चा वळवित त्यांच्या घरातून सोन्या-चांदीच्या दागिण्यासह 6 लाख 55 हजार 683 रुपयांच्या मुद्देमाल लंपास केल्याने पोलिसांपेक्षा चोरट्यांचे नटवर्क पावर फुल्ल असल्याच्या चर्चा आहे. मात्र 10 ऑक्टोबर रोजी दिवसाढवळ्या झालेल्या चोरीमुळे परिसरात भितीचे वातावरण पसरले असून चोरट्यांनी पकडण्याची मागणी होत आहे.
रविकुमार शिवाजी राठोड रा.चैतन्यवाडी यांनी मलकापूर शहरात फिर्याद दाखल केली की, ते मागील दीड वर्षापासून मलकापूर शहरातील चैतन्यवाडी येथे सचिन नारखेडे यांच्या घरामध्ये भाड्याने राहतात. ते गांधारी ता.लोणार येथील राहिवासी असून महाराष्ट्र वखार महामंडळ येथे नोकरीला आहे. 10 ऑक्टोबर रोजी फिर्यादीची पत्नी दुपारी 2 वाजेच्या सुमारास घराला कडीकोंडा लावून शेजारील रमेश पाटील यांच्या घरी गेली होती. दरम्यान, चोरट्यांनी त्यांच्या घरात प्रवेश करीत घरातील लोखंडी कपाटातील सोन्याची चैन 13 ग्रॅम 75 हजार 730 रुपये, सोन्याची अंगठी 5 ग्रॅम 28 हजार 570 रुपये, सोन्याची अंगठी 3 ग्रॅम 19 हजार 200 रुपये, सोन्याचा गोप 10ग्रॅम 51 हजार, सोन्याचे गहुमणी 7 ग्रॅम 66 हजार 526 रुपये, सोन्याची अंगठी 10ग्रॅम 54 हजार 593 रुपये, सोन्याचे ब्रासलेट 17 ग्रम 1 लाख 70 हजार 64 रुपये, नगदी 1 लाख 75 हजार, मोबाईल 15 हजार असा एकूण 6 लाख 55 हजार 683 रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याच्या फिर्यादीवरुन मलकापूर शहर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुध्द भारतीय न्याय संहिता 2023 कलम 331(1), 305(a) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस करीत आहे.
भरदिवसा चोरी झाल्याने नागरिक भयभीत
चैतन्यवाडीमध्ये भरदिवसा दुपारी 2 वाजेच्या सुमारास झालेल्या चोरीमुळे पोलिसांपेक्षा चोरट्यांचे नेटवर्क पावरफुल्ल असल्याचे सिध्द झाले आहे. त्यातच सकाळी 14 वर्षीय मुलीचे झालेले अपहरणामुळे पोलिसांचा वचक राहिला नाही का? असा प्रश्न उपस्थित केल्या जात आहे. सदर चोरट्यांना पकडण्याचे मलकापूर शहर पोलिसांसमोर एक मोठे आव्हान आहे.