61 जिल्हा परिषद गट व 13 पंचायत समिती सभापतीचे आरक्षण सोडत जाहीर

10

7 पंचायत समितीवर असणार महिलाराज; घाटाखालील 4 तालुक्याचा समावेश

बुलढाणा: जिल्ह्यातील 61 जिल्हा परिषद गट व 13 पंचायत समिती सभापती पदाच्या आरक्षणाची सोडत सोमवार 13 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृह येथे पार पडली. जिल्हाधिकारी डॉ.किरण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सोडत पध्दतीने प्रक्रीया पार पडली. यावेळी चिमुकल्यांच्या हस्ते चिठ्ठी काढून आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. घाटाखालील चार तर घाटावरील 3 अशा 7 पंचायत समितीच्या सभापतीची कमान आता महिलांकडे राहणार आहे.

जिल्हा परिषद गटासाठी आरक्षण पुढीलप्रमाणे : अनुसूचित जाती एकूण 12 जागेपैकी सर्वसाधारण 6, महिला 6, अनुसूचित जमाती एकूण 3 जागेपैकी सर्वसाधारण 1, महिला 2, नागरिकांचा मागास प्रवर्ग एकूण 16 जागेपैकी सर्वसाधारण 8 महिला 8, सर्वसाधारण एकूण 30 जागेपैकी सर्वसाधारण 15, महिला 15 अश्या एकूण 61 जागांसाठी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. या सोडतीच्या प्रक्रियेस मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात, उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुहासिनी गोणेवार, तहसीलदार संजय बगाडे आदींसह संबंधित अधिकारी, जनप्रतिनिधी तसेच विविध पंचायत समित्यांचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते.

असे आहे जिल्हा परिषद गटाचे आरक्षण
जळगांव जामोद तालुक्यातील 1-जामोद(अनुसूचित जमाती), 2-खेर्डा बु.-(सर्वसाधारण), 3-आसलगाव-(अनुसूचित जमाती महिला), 4-पिंपळगांव काळे(सर्वसाधारण), संग्रामपूर तालुक्यातील 5- सोनाळा(अनुसूचित जमाती महिला), 6- बावनबीर(सर्वसाधारण महिला), 7- पळशी झाशी(नगरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग) 8-पातुर्डा बु.(नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला), शेगांव तालुक्यातील 9- माटरगांव बु (अनुसूचित जाती), 10-जलंब(अनुसुचित जाती महिला), नांदूरा-तालुक्यातील 11- निमगांव(सर्वसाधारण महिला), 12-वसाडी बु.(नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग), 13-चांदूर बिस्वा (नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग), 14-वडनेर भोलजी (नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग).मलकापूर तालुक्यातील 15-नरवेल(सर्वसाधारण महिला), 16- मलकापूर ग्रामीण (सर्वसाधारण महिला), 17- दाताळा(सर्वसाधारण महिला), मोताळा तालुक्यातील 18-पिंप्रीगवळी (सर्वसाधारण), 19-कोथळी (सर्वसाधारण),20-धामणगांव बढे(सर्वसाधारण महिला), 21-रोहिणखेड (सर्वसाधारण), 22-बोराखेडी(नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग), खामगाव तालुक्यातील 23- सुटाळा बु.(नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला), 24- घाटपुरी(सर्वसाधारण), 25-अटाळी(अनुसूचित जाती), 26-अंत्रज (नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग), 27- पिंपळगाव राजा(सर्वसाधारण महिला), 28- कुंबेफळ (नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला), 29- लाखनवाडा (अनुसूचित जाती), मेहकर तालुक्यातील 30-देऊळगाव साकशी (सर्वसाधारण महिला), 31-डोणगाव(सर्वसाधारण), 32-अंजनी बु.(सर्वसाधारण), 33-जानेफळ (नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग), 34- कळंबेश्वर (अनुसूचित जाती महिला), 35-देऊळगाव माळी (अनुसूचित जाती), 36-उकळी(सर्वसाधारण (महिला).चिखली तालुक्यातील 37-उदयनगर(नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग),38-अमडापुर(सर्वसाधारण महिला), 39- इसोली(सर्वसाधारण), 40-सवणा(सर्वसाधारण महिला), 41-केळवद(अनुसूचित जाती महिला), 42-शेळगाव आटोळ(नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला), 43-मेरा बु.(अनुसूचति जाती महिला), बुलढाणा तालुक्यातील 44 देऊळघाट(सर्वसाधारण महिला), 45-सुंदरखेड(अनुसूचित जाती महिला), 46-साखळी बु.(सर्वसाधारण महिला), 47-मासरुळ(सर्वसाधारण), 48-धाड(नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला), 49-रायपुर(सर्वसाधारण महिला), देऊळगाव राजा तालुक्यातील 50-देऊळगाव महि(सर्वसाधारण), 51 सिनगाँव जहॉगीर(सर्वसाधारण), 52-सावखेड भोई(अनुसूचित जाती), सिंदखेड राजा तालुक्यातील 53-साखरखेर्डा(सर्वसाधारण महिला), 54-शेंदुर्जन(नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला), 55- किनगांव राजा(सर्वसाधारण), 56-दुसरबीड(अनुसूचित जाती महिला), 57-वर्दडी बु.(नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला), लोणार तालुक्यातील 58-सुलतानपुर(सर्वसाधारण), 59-वेणी(अनुसूचित जाती), 60-बिबी(सर्वसाधारण), 61-पांग्रा डोळे(नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला) असे आहे.

  • पंचायत समिती सभापतीचे आरक्षण
    आज 13 ऑक्टोबर रोजी 13 पंचायत समित्यांचे सभापती आरक्षण जाहीर करण्यात आले. यामध्ये बुलढाणा तालुका- अनुसूचित जाती, नांदुरा- अनुसुचित जाती(महिला), मोताळा-अनुसुचित जाती, चिखली अनुसुचित जमाती(महिला), खामगांव- नागरिकांचा मागास प्रवर्ग(महिला), मेहकर- नागरिकांचा मागास प्रवर्ग, शेगांव- नागरिकांचा मागास प्रवर्ग(महिला), देऊळगाव राजा-सर्वसाधारण (महिला), लोणार-सर्वसाधारण (महिला), सिंदखेड राजा- सर्वसाधारण, मलकापूर- नागरिकांचा मागास प्रवर्ग, जळगांव जामोद-सर्वसाधारण(महिला), संग्रामपूर- सर्वसाधारण.
  • 17 ऑक्टोंबरपर्यंत नोंदविता येणार हरकती
    १४ ऑक्टोबर रोजी प्रारुप आरक्षणाची अधिसूचना प्रसिद्ध करणे, १४ ते १७ ऑक्टोबर २०२५ दरम्यान जिल्हाधिकारी यांच्याकडे जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमधील प्रारुप आरक्षणावर हरकती व सूचना सादर करणे, २७ ऑक्टो. रोजी प्राप्त प्रारुप आरक्षणावरील हरकती व सूचना आधारे अभिप्रायासह गोषवारा विभागीय आयुक्त यांना सादर करणे, ३१ ऑक्टो.रोजी प्रारुप आरक्षणावर प्राप्त हरकती व सूचनांचा विचार करुन आरक्षण अंतिम करणे, ३ नोव्हेंबर २०२५ रोजी अंतिम आरक्षण शासन राजपत्रात प्रसिद्ध करणे असा हा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.